कफ सिरपमुळे राजस्थानमध्ये आणखी एका बालकांचा मृत्यू ; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
जयपूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। विषारी कफ सिरपमुळे लहान मुलांच्या मृत्यू वाढत चालला आहे. अशातच राजस्थानमध्ये कफ सिरप प्यायल्याने आणखी एका बालकाचा मृत्यू झाला असून, एकूण मृत्यूंची संख्या आता १४ झाली आहे. अनेक मुलांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे सांगितले
कफ सिरप प्यायल्याने राजस्थानमध्ये आणखी एका बालकांचा मृत्यू


जयपूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। विषारी कफ सिरपमुळे लहान मुलांच्या मृत्यू वाढत चालला आहे. अशातच राजस्थानमध्ये कफ सिरप प्यायल्याने आणखी एका बालकाचा मृत्यू झाला असून, एकूण मृत्यूंची संख्या आता १४ झाली आहे. अनेक मुलांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मुलांच्या मृत्यूनंतर प्रशासन आणि क्रेंद्र सरकारने कारवाई सुरु केली आहे.

जयपूरमध्ये सहा वर्षांचा अंश या मुलाचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी सांगितले की, मुलाला घरात दिलेल्या कफ सिरपनंतर प्रकृती खालावली. याआधी भरतपूर आणि सीकर जिल्ह्यात दोन बालमृत्यू झाले होते. दोघांनाही सरकारी औषध योजनेत दिलेले Dextromethorphan Hydrobromide Syrup IP हे सिरप देण्यात आले होते, जे KAYSONS Pharma कंपनीने तयार केले होते. राज्य सरकारच्या तपासात मात्र हे सिरप सुरक्षित आढळले, असे आरोग्यमंत्री गजेन्द्र सिंह खीमसर यांनी सांगितले आहे.

१४ बालकांच्या मृत्यूनंतर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) ने तमिळनाडू फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनला 'कोल्डरिफ' सिरप तयार करणाऱ्या Sresan Pharmaceutical कंपनीविरुद्ध गंभीर गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिव, औषध नियंत्रकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार आहेत. बैठकीत कफ सिरपचा तर्कसंगत वापर, औषधांची गुणवत्ता आणि तपास प्रक्रिया यावर चर्चा होणार आहे.

छिंदवाडा जिल्ह्यात 'कोल्डरिफ' सिरप दिल्यानंतर 11 मुलांचा मृत्यू झाला. प्रशासनाने कडक कारवाई करत डॉ. प्रवीण सोनी याला अटक केली. त्याने मृत मुलांपैकी अनेकांना हे सिरप लिहून दिले होते. डॉ. सोनी आणि Sresan Pharmaceutical च्या संचालकांविरुद्ध ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स अॅक्टच्या कलम 27(A) तसेच बीएनएस कलम 105 आणि 276 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, छिंदवाड्यातील मृत्यू अत्यंत दु:खद आहेत. आम्ही 'कोल्डरिफ' सिरपच्या विक्रीवर संपूर्ण बंदी घातली आहे. कंपनीच्या इतर उत्पादनांवरही कारवाई होईल. दोषींना वाचवले जाणार नाही.

तेलंगाणा ड्रग कंट्रोल अॅडमिनिस्ट्रेशनने 'कोल्डरिफ' सिरपच्या SR-13 बॅचवर पब्लिक अलर्ट - स्टॉप युज नोटीस जारी केली आहे. केरळ सरकारनेही विक्री तात्पुरती स्थगित केली असून सर्व नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या, फ्लॅग केलेला बॅच केरळमध्ये विकला गेला नाही, तरी सॅम्पल तपासणीसाठी पाठवले आहेत.

केंद्रीय औषध नियंत्रकाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, तमिळनाडू, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या सहा राज्यांतील औषध कारखान्यांची तपासणी सुरू केली आहे. 19 सॅम्पल्स (कफ सिरप, अँटीबायोटिक्स, अँटीपायरेटिक्स) घेतले गेले असून त्यांचा उद्देश गुणवत्ता तपासणी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुधारणा करणे आहे. ICMR, NIV, NEERI, CDSCO आणि AIIMS-नागपूर या संस्थांच्या तज्ज्ञांची टीम छिंदवाड्यात पोहोचली असून ते किडनी फेल्युअर आणि मृत्यूंची मूळ कारणे शोधत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande