अंशुला कपूरचा साखरपुडा कपूर परिवाराच्या जल्लोषात संपन्न
मुंबई, 5 ऑक्टोबर,(हिं.स.)। निर्माता बोनी कपूर यांची कन्या अंशुला कपूर हिने आपला बॉयफ्रेंड रोहन ठक्कर सोबत २ ऑक्टोबर रोजी साखरपुडा केला असून, हा सुंदर समारंभ बोनी कपूर यांच्या बांद्र्यातील बंगल्या मध्ये पार पडला. परंपरागत ‘गोर धाना’ विधीनुसार झालेल
Anshula


मुंबई, 5 ऑक्टोबर,(हिं.स.)।

निर्माता बोनी कपूर यांची कन्या अंशुला कपूर हिने आपला बॉयफ्रेंड रोहन ठक्कर सोबत २ ऑक्टोबर रोजी साखरपुडा केला असून, हा सुंदर समारंभ बोनी कपूर यांच्या बांद्र्यातील बंगल्या मध्ये पार पडला.

परंपरागत ‘गोर धाना’ विधीनुसार झालेल्या या सोहळ्यात संपूर्ण कपूर परिवार एकत्र जमला होता. साखरपुडा झाल्यानंतर अंशुलाने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली.

या खास दिवशी अंशुलाने परिधान केलेला बैंगनी रंगाचा लहंगा-चोळी तिच्या सौंदर्यात भर घालत होता. तिच्या आणि रोहन ठक्कर यांच्या रोमॅण्टिक केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

जाह्नवी कपूर आणि खुशी कपूर या दोघीही यावेळी आनंदी दिसल्या. तर बोनी कपूर यांनी मुलगी आणि जावयाला आशीर्वाद दिला. अर्जुन कपूरने आपल्या भावी मेहुण्याला टीका लावताना घेतलेला फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.

सगाईतील सर्वात भावनिक क्षण म्हणजे अंशुलाने तिच्या दिवंगत आई मोना शौरी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. तिने त्यांच्या फोटोसाठी एक विशेष खुर्ची सजवली होती आणि त्या जागेवर बसून तिने आईच्या आठवणींना मनापासून सलाम केला.

या आनंदी सोहळ्यात सोनम कपूर आणि शनाया कपूर यांची उपस्थितीही खास ठरली. संपूर्ण कपूर परिवाराचा हसरा, आनंदी आणि प्रेमाने भरलेला हा सोहळा सध्या सोशल मीडियावर गाजत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande