थेट निवडणुकीचे आरक्षण सोमवारी जाहीर होणार
सोलापूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.) गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली असून, याच पार्श्वभूमीवर मोहोळ नगरपरिषदेच्या राजकारणाला आता वेगळी दिशा मिळणा
थेट निवडणुकीचे आरक्षण सोमवारी जाहीर होणार


सोलापूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली असून, याच पार्श्वभूमीवर मोहोळ नगरपरिषदेच्या राजकारणाला आता वेगळी दिशा मिळणार आहे. कारण, सोमवारी (दि. ६ ऑक्टोबर) मोहोळ नगरपरिषदेच्या जनतेतून नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे, तर बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर) नगरसेवक पदांसाठी आरक्षण काढले जाणार आहे.या आरक्षण सोडतीकडे मोहोळ शहरातील सर्वपक्षीय इच्छुकांचे लक्ष लागले असून, आतापासूनच राजकीय बांधणी करण्याची लगबग सुरू झाली आहे. या आरक्षणामुळे मोहोळ नगरपरिषदेचे नेतृत्व कोणत्या प्रवर्गाकडे जाणार आणि कोणत्या प्रभागातून कोणाला संधी मिळणार, याचा फैसला होणार आहे.संपूर्ण राज्यात जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण झाल्यानंतर आता नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा होती. प्रशासनाकडून याबद्दलची माहिती देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande