पालघरात रा. स्व. संघाचा शताब्दी वर्ष विजयादशमी उत्सव संपन्न
पालघर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष विजयादशमी उत्सव हा जव्हार विभागाच्या वतीने रविवारी सकाळी ११ वाजता शहरातील श्रीराम मंदिर येथील रामतीर्थ सभागृह येथे उत्साहात पार पडला. या वेळी मोठ्या संख्येने स्वयंसेवक, कार्यकर्ते व
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष विजयादशमी उत्सव पार पडला


पालघर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष विजयादशमी उत्सव हा जव्हार विभागाच्या वतीने रविवारी सकाळी ११ वाजता शहरातील श्रीराम मंदिर येथील रामतीर्थ सभागृह येथे उत्साहात पार पडला. या वेळी मोठ्या संख्येने स्वयंसेवक, कार्यकर्ते व नागरिक येथे उपस्थित होते. संघ स्थापनेच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा विजयादशमी उत्सव ऐतिहासिक ठरला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते दर्शन तामोरे यांची उपस्थिती लाभली. शहरातील अनेक उपक्रमात, समाजकार्यात तत्पर मदत देणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व संघगीताने झाली. त्यानंतर शाखेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. प्रमुख वक्ते मा. राजन बागडे (पालघर जिल्हा प्रचारक) यांनी संघाचे राष्ट्रनिर्माण, सेवा व संस्कार यावरील कार्य अधोरेखित करत तरुण पिढीने देशहितासाठी सक्रिय होण्याचे आवाहन केले.विजयादशमी हा सत्य, धर्म आणि न्यायाच्या विजयाचे प्रतीक असून, संघकार्य हे त्या मूल्यांवर आधारित असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी संघ पदाधिकारी, ज्येष्ठ स्वयंसेवक, तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख यजमान गोविंद अभ्यंकर होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संघाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभी आयोजित हा विजयादशमी उत्सव स्थानिक पातळीवर प्रेरणादायी ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande