लवकरच मराठवाडाव्यापी हंबरडा मोर्चा काढणार - अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय येथे मराठवाडाव्यापी हंबरडा मोर्चा लवकरच काढण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेना (उबाठा) नेते आमदार अंबादास दानवे यांनी दिली. स
अ


छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय येथे मराठवाडाव्यापी हंबरडा मोर्चा लवकरच काढण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेना (उबाठा) नेते आमदार अंबादास दानवे यांनी दिली. संभाजीनगर जिल्ह्यासह शहरातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय येथे मराठवाडाव्यापी हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे. सदरील मोर्चा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विराट झाला पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडली.

याप्रसंगी माजी आमदार उदयसिंग राजपूत, उपनेते सचिन घायाळ, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात आदी नेते पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande