महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी नागपुरात काँग्रेस पदाधिका-यांचे दोन दिवसांचे शिबीर संपन्न
नागपूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्रात अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजा उद्ध्वस्थ झाला आहे, पण भाजपा महायुती सरकारने अद्याप दमडीचीही मदत दिली नाही. सरकारने फक्त कोरडया घोषणा केल्या. रविवारी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री महाराष्ट्रात एका क
महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी नागपुरात काँग्रेस पदाधिका-यांचे दोन दिवसांचे शिबीर संपन्न


नागपूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

महाराष्ट्रात अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजा उद्ध्वस्थ झाला आहे, पण भाजपा महायुती सरकारने अद्याप दमडीचीही मदत दिली नाही. सरकारने फक्त कोरडया घोषणा केल्या. रविवारी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री महाराष्ट्रात एका कार्यक्रमाला आले पण शेतक-यांच्या संकाटावर व मदतीवर एक शब्द बोलले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री अमित शाह यांच्यासमोर हतबल झाले. राज्यातील संकटात असेलेल्या शेतकरी प्रश्नावर अमित शाह एक शब्दही बोलले नाहीत व राज्याचे नेतृत्व करणारेही मूग गिळून गप्प बसले हा महाराष्ट्राच्या शेतक-यांचं घोर अपमान असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

नाग लोक कामठी येथील काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या सांगता कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यातील अतिवृष्टीने शेतक-याचे होते नव्हते, असे सर्व वाहून गेले आहे, पण भाजपा महायुती सरकारने अद्याप कवडीचीही मदत केली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहिल्यानगरच्या दौ-.यावर आले पण त्यांनी शेतक-यांना मदत देण्याबाबत एक शब्दही काढला नाही. भाजपा हा शेतकरी विरोधी पक्ष असून त्यांनी शेतक-यांनाच वा-यावर सोडले आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीने द्यावी, रब्बी हंगामासाठी बियाणे खते मोफत द्यावे व शेतकरी कर्जमाफी द्यावी या मागण्या काँग्रेस पक्षाने केल्या आहेत. पण राज्याचे मुख्यंमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह समोर तोंडही उघडले नाही, हा शेतक-यांचा घोर अपमान आहे. शेतकरी मरत असतानाही भाजपा सरकार मदत करत नाही. हे अंत्यत दुर्दैवी आहे. तातडीने मदत जाहीर करावी याचा पुनरुच्चार काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.

*काँग्रेस पक्षाचे शिबीर संपन्न*

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नागलोक कामठी, नागपूर येथे “आजचे शहरी राजकारण” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध शहरांतील माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष, शहराध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक तसेच निवडक प्रदेश पदाधिकारी सहभागी झाले होते.

कार्यशाळेचे उद्‌घाटन प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते झाले. त्यांनी आगामी काळात शहरांमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे पक्षाचे ठाम धोरण स्पष्ट केले. सत्तेचे विकेंद्रीकरण हा काँग्रेसचा मूलमंत्र असून, त्यातूनच पक्षाला बळकटी मिळेल असे त्यांनी अधोरेखित केले.

माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी नागरिकांच्या दैनंदिन अडचणी (वीजबिले, इन्शुरन्स इ.) सोडवण्यासाठी कार्यक्षम उपाययोजना कशा राबवता येतील यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

*माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा काँग्रेस मध्ये भव्य पक्ष प्रवेश*

वरोरा (जिल्हा चंद्रपूर) नगर परिषदेचे चे माजी नगराध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा सचिव तसेच भाजप अल्पसंख्यक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अहेतेशाम अली यांनी आपल्या समर्थकांसोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी २१००० पेक्षा जास्त मते घेऊन त्यांनी आपल्या जनाधाराची चुणूक दाखवली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते खासदार मा.श्री.राहुल गांधी, मा. खासदार श्रीमती प्रियंका गांधी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व त्यांच्या कार्याने प्रभावीत होऊन चंद्रपूर लोकसभेच्या सक्रिय व धाडसी खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वात अहेतेशाम अली यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून लोकशाही वाचविण्याच्या या लढाईत सहभागी होण्याचा निर्णय घेऊन नागपूर प्रेस क्लब येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष तूळशीराम श्रीरामे, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande