नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला हवाई प्रवास शुल्कावर लक्ष ठेवण्याचा, विशेषतः सणासुदीच्या काळात, दरात वाढ झाल्यास योग्य ती पाऊले उचलण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार, महासंचालनालयाने सक्रीय पुढाकार घेत विमान कंपन्यांशी संपर्क साधला आणि सणासुदीच्या काळात वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त विमानसेवा सुरू करत क्षमता वाढविण्यास सांगितले.
या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत विमान कंपन्यांनी खालीलप्रमाणे अतिरिक्त विमानसेवा सुरू करणार असल्याचे कळवले आहे:
इंडिगो : 42 मार्गांवर सुमारे 730 अतिरिक्त उड्डाणे सुरू करणार.तर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस: 20 मार्गांवर सुमारे 486 अतिरिक्त उड्डाणे सुरू करणार आहे. तसेच स्पाईसजेट ही 38 मार्गांवर सुमारे 546 अतिरिक्त उड्डाणे सुरू करणार आहे.
प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय सणासुदीच्या काळात विमान कंपन्यांच्या दरांवर आणि विमानसेवा क्षमतेवर कठोर देखरेख ठेवणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule