भाजपाच्या धाराशिव जिल्हा बैठकीत संघटनात्मक कार्याची झाली महत्वपूर्ण चर्चा
छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। भाजपा खा. डॉ. भागवत कराड यांच्या मराठवाडा दौऱ्यादरम्यान धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्ह्याची जीएसटी आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान व पदवीधर निवडणूक नोंदणी अभियान या महत्त्वपूर्ण उपक्रमांसाठी बैठक प
अ


छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। भाजपा खा. डॉ. भागवत कराड यांच्या मराठवाडा दौऱ्यादरम्यान धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्ह्याची जीएसटी आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान व पदवीधर निवडणूक नोंदणी अभियान या महत्त्वपूर्ण उपक्रमांसाठी बैठक पार पडली.

या बैठकीत संघटनात्मक कार्याची दिशा ठरविणे, कार्यकर्त्यांची भूमिका निश्चित करणे तसेच अभियानांची परिणामकारक अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा झाली. जीएसटीमुळे व्यापारी वर्गाला दिलासा, सुलभता आणि पारदर्शकता मिळणार आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पना युवक व महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवणार आहे, तर पदवीधर निवडणूक नोंदणी अभियान नव्या पिढीला लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन देणार आहे.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार श्री. सूरजितसिंह ठाकुर, प्रदेश सरचिटणीस आमदार श्री. संजय केनेकर, जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता कुलकर्णी, आत्मनिर्भर भारत संकल्प सहसंयोजक श्री. समीर राजूरकर, माजी जिल्हाध्यक्ष श्री. नितीन काळे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande