छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। धाराशिव जिल्ह्यातील रूई ढोकी जवळील तेरणा नदीने पुन्हा एकदा पात्र सोडले आहे. ही केवळ रुई ढोकी येथेच नाही तर बहुतांश गावात अशीच स्थिती आहे.भाजपा आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी नदीकाठच्या गावातील पूर परिस्थिती पाहणी केली. या संकटकाळात आपण शेतकरी बांधवांसोबत ठामपणे उभे आहोत. हे संकट अभूतपूर्व असेच आहे.
यापूर्वी कधीच असे विदारक चित्र पाहिले नव्हते. नद्यांनी शेतशिवार अक्षरशः गिळून टाकले आहे. अशा वेळी जास्तीत जास्त ठिकाणी शेतकरी बांधवांना भेटून दिलासा देण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. असे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
सरसकट नुकसानभरपाई मिळणार आहेच. मात्र नुकसानीची व्याप्ती ध्यानात घेऊन भरीव मदतीसाठी 'मित्र'च्या माध्यमातून विशेष उपाययोजनाही राबविण्याचा आपला प्रयत्न आहे.असे ते म्हणाले हताश होऊ नका, खचून जाऊ नका.. आपलं महायुती सरकार प्रामाणिकपणे दिलासा देण्यासाठी कटिबद्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis