महाविस्तार अ‍ॅप देणार शेतकर्‍यांना सल्ला
सोलापूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकर्‍यासांठी महाविस्तार एआय अ‍ॅप लाँच केला असून, या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सल्ला देण्याबरोबरच पिकांवरील रोगही कळणार आहे.शेतकर्‍यांना हवामान बदल बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच
महाविस्तार अ‍ॅप देणार शेतकर्‍यांना सल्ला


सोलापूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकर्‍यासांठी महाविस्तार एआय अ‍ॅप लाँच केला असून, या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सल्ला देण्याबरोबरच पिकांवरील रोगही कळणार आहे.शेतकर्‍यांना हवामान बदल बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार एआय हे अ‍ॅप लाँच केले आहे. हे कृषी विभागाने विकसित केलेले एक अत्याधुनिक अ‍ॅप आहे. कृत्रिम बुद्धिमतेच्या सहाय्याने हे अ‍ॅप शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अ‍ॅप शेतकर्‍यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पद्धतींचे मार्गदर्शन करते.महाविस्तार एआय अ‍ॅपमधील चॅटबॉट शेतकर्‍यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देते. रिअल-टाइम हवामान अंदाज, स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल-टाइममध्ये दाखवते. कृषी विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती, अनुदान, आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळू शकतील. अ‍ॅपमध्ये मराठीत व्हिडीओ उपलब्ध आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande