सोलापूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रवाशांचे विचार करून राज्य परिवहन महामंडळाच्या येथील विभागीय कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील नऊ आगारांतून 73 लालपरीच्या माध्यमातून दररोज 134 फेर्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व एसटी लांबपल्ल्यासह एकूण 32 हजार 413 किलोमीटर इतके अंतर सेवेत राहतील. वाढीव फेर्यांचा कालावधी हा 15 आक्टोेबर 5 नोव्हेंबर असेल. आंतरराज्य फेर्यांऐवजी फक्त राज्यातील विविध मार्गावर फेर्या वाढविल्या आहेत.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लालपरीच्या प्रशासनाकडून 73 वाढीव गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून गाड्यांची सोय केला आहे. सोेलापूर : अहिल्यानगर, छ. संभाजी नगर. 10, स्वारगेट- पंढरपूर : परळी, मुंबई, स्वारगेट, चाकण, स्वारगेट 7, बार्शी : स्वारगेट 9, अक्कलकोट : त्र्यंबकेश्वर, स्वारगेट 7, करमाळा : मुंबई, लातूर, स्वारगेट 10, अकलूज : लातूर, सातारा, स्वारगेट 5, सांगोला : अहिल्यानगर, स्वारगेट, कोल्हापूर 5, कुर्डूवाडी : छत्रपती संभाडी, स्वारगेट 10, मंगळवेढा : अहिल्यानगर, नारायणगड, अहमदपूर, स्वारगेट 7
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड