नाशिक, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
निफाड ,कळवण, दिंडोरी नंतर देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखरी येथे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात काळे झेंडे लावून निषेध व्यक्त केला. यावेळी देवळा तालुका माजी काँग्रेस अध्यक्ष दिलीप पाटील व इतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काळे झेंडे लावून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, मोती नाना पाटील दिलीप पाटील कैलास बोरसे 938 आदिवासी सहकारी संस्थेचे राज्याध्यक्ष यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक व राज्य शासनाचा यावेळी निषेध करण्यात आला शेतकऱ्यांच्या जमीन जप्तीच्या नोटीसा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक अजूनही बंद करत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्ज वसुलीस स्थगिती दिली आहे तरीही जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलावाच्या जाहिराती वृत्तपत्रात देत असल्याने जिल्हा बँकेचा राज्य शासनाचा यावेळेस जाहीर निषेध करण्यात आला.
जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफी आणि इतर प्रश्नांवरून काळे झेंडे लावून निषेध करण्याचे हे आंदोलन आता वाढू लागले आहे यापूर्वी शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये हे आंदोलन जोर धरत आहे आता इतरही तालुके यामध्ये सहभागी होत आहे
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV