सातपूरला पुन्हा कॅफेमध्ये गोळीबार; एक जखमी
नाशिक, 5 ऑक्टोबर (हिं.स.) शहरामध्ये गेल्या काही दिवसात गुन्हेगारीने डोके वर काढले असून खून, दरोडे यासारख्या अनेक घटनांत वाढ होत आहे. पोलिसांकडून गुन्हेगारी कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी गुन्हेगारी कारवाया थांबण्यास तयार नाही. शन
सातपूरला पुन्हा कॅफेमध्ये गोळीबार; एक जखमी


नाशिक, 5 ऑक्टोबर (हिं.स.)

शहरामध्ये गेल्या काही दिवसात गुन्हेगारीने डोके वर काढले असून खून, दरोडे यासारख्या अनेक घटनांत वाढ होत आहे. पोलिसांकडून गुन्हेगारी कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी गुन्हेगारी कारवाया थांबण्यास तयार नाही. शनिवारी मध्यरात्री सातपूर आयटीआय सिग्नल जवळ एका कॅफेत गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली.

सातपूर आयटीआय सिग्नल येथील नाईस कॅफे येथे रात्रीच्या सुमारास तिवारी नामक व्यक्तीवर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिवारी याला मुंबई नाका येथील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असून तिवारी याच्या पायाला गोळी लागलयाची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा हल्ला नेमका कोणी केला कुठल्या कारणावरून केला याचा शोध पोलिसांच्या वतीने घेतला जात आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या वतीने विविध पथके संबंधित आरोपीला शोधण्यासाठी रवाना केलेली असून लवकरच आरोपी मिळेल असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande