लातूर : शिवेंद्रसिंहराजे भोसलेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
लातूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रेणापूर तालुक्यातील हरवाडी आणि लातूर तालुक्यातील महापूर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच यावेळी शेतकरी, ग्रामस्थांकडून न
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली हरवाडी, महापूर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी


लातूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रेणापूर तालुक्यातील हरवाडी आणि लातूर तालुक्यातील महापूर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच यावेळी शेतकरी, ग्रामस्थांकडून नुकसानीची माहिती घेतली.

हरवाडी येथे पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनींचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. तसेच येथील शेतकऱ्यांना नदी ओलांडून शेतामध्ये जाण्याकरिता नाबार्डच्या योजनेतून पूल उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. भोसले यांनी दिल्या. तसेच गावातील जलजीवन मिशन योजनेतील विहिरीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

महापूर येथे अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची, तसेच मांजरा नदीवरील बरेजची पाहणी केली. यावेळी नदीकाठावरील शेतकऱ्यांनी मांडलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी सांगितले.

अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांवर कोसळलेले संकट मोठे आहे. मात्र, या संकटाने खचून न जाता, शेतकऱ्यांनी तणावातून बाहेर यावे. शेतपिकांच्या नुकसानीपोटी जास्तीत जास्त मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने नुकसानीचे पंचनामे करताना कोणीही वंचित राहू नये, याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. या संकटातून बाहेर पाडण्यासाठी शासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वास पालकमंत्री श्री. भोसले यांनी महापूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिला.

******

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande