कोलंबो, 5 ऑक्टोबर (हिं.स.) : पाकिस्तानविरुद्धच्या महिला एकदिवसीय विश्वचषक सामन्यादरम्यान भारतीय महिला क्रिकेटपटूंनी हस्तांदोलन न करण्याचे धोरण कायम ठेवले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक सामना कोलंबोमध्ये खेळला जात आहे. हरमनप्रीत कौरने पाकिस्तानची कर्णधार फातिमा साना हिच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत आणि हे मैदानावरही स्पष्ट झाले आहे. पुरुषांच्या आशिया कप दरम्यान भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने आले आणि तिन्ही सामने वादग्रस्त ठरले. पुरुषांच्या संघाप्रमाणे भारतीय महिला संघानेही हस्तांदोलन न करण्याचे धोरण स्वीकारले. आणि सामन्यादरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन केले नाही. हरमनप्रीत आणि फातिमा नाणेफेकीसाठी मैदानावर आल्या तेव्हा त्यांच्यात कोणताही संवाद झाला नाही. हरमनप्रीतने फातिमाकडे दुर्लक्ष केले आणि तिच्याकडे पाहिलेही नाही.
या सामन्यासाठी भारताने त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये एक बदल केला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने जाहीर केले की, अमनजोत कौर आजारी आहे आणि आजचा सामना खेळू शकणार नाही. तिच्या जागी रेणुका सिंग खेळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे