भारत अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवण्याच्या प्रक्रियेत - एस. जयशंकर
नवी दिल्ली , 5 ऑक्टोबर (हिं.स.)। भारत अमेरिका सोबत काही मुद्दे सोडवण्याच्या प्रक्रियेत आहे आणि या दिशेने प्रगती होत आहे, असे महत्त्वपूर्ण विधान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केईसी 2025 या कार्यक्रमात भारत आणि अमेरिका यांच्यात टॅरिफ (शुल्क) संदर्भ
- एस. जयशंकर


नवी दिल्ली , 5 ऑक्टोबर (हिं.स.)। भारत अमेरिका सोबत काही मुद्दे सोडवण्याच्या प्रक्रियेत आहे आणि या दिशेने प्रगती होत आहे, असे महत्त्वपूर्ण विधान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केईसी 2025 या कार्यक्रमात भारत आणि अमेरिका यांच्यात टॅरिफ (शुल्क) संदर्भातील सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केले आहे. त्यांनी असेही नमूद केले की, रशियाकडून उर्जेच्या स्रोतांची खरेदी या संदर्भात आणखी एक टॅरिफ लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर, क्वाडच्या संबंधिततेबाबत त्यांनी महत्त्वाचे विचार मांडले.

दिल्ली येथे आयोजित चौथ्या कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्फरन्स (केईसी) च्या समारोपाच्या वेळी, जयशंकर यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेत होणाऱ्या धीम्या प्रगतीला एक प्रमुख अडथळा असल्याचे नमूद केले.त्यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारांवर अद्याप अंतिम सहमती झालेली नाही, त्यामुळेच अमेरिकेने भारतावर काही टॅरिफ (शुल्क) लादले आहेत. भारताने हे शुल्क सार्वजनिकरित्या “अनुचित” असे जाहीर केले आहे.

रशियाकडून उर्जा पुरवठ्याबाबत अमेरिकेने लादलेले टॅरिफ देखील भारतासाठी एक आव्हान ठरत आहेत. जयशंकर यांनी यावर भर देत सांगितले की, “इतर काही देशही रशियाकडून तेल खरेदी करत आहेत, पण भारताला विशेषतः लक्ष्य केलं जात आहे.” त्यांनी स्पष्ट केलं की, हे सर्व मुद्दे सोडवणे गरजेचे आहे आणि भारत या दिशेने सक्रियपणे प्रयत्न करत आहे.

दुसरीकडे, जयशंकर यांनी क्वाड संदर्भात या मंचाचं महत्त्व अधोरेखित करत त्याला सक्रिय आणि प्रभावी मंच असल्याचं म्हटलं. जयशंकर यांनी सांगितले की, या वर्षी क्वाड (भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दोन बैठकांचा आयोजन करण्यात आला होता, ज्यापैकी पहिली बैठक अध्यक्ष ट्रम्प यांच्या सत्तेवर येताच झाली होती.

त्यांनी क्वाडच्या स्थिरतेवर आणि बळकटीवर भर दिला आणि स्पष्टपणे म्हटल, “ क्वाड जिवंत आहे आणि सक्रिय आहे. अशा काळात जेव्हा जागतिक पातळीवर आव्हाने आहेत, तेव्हा त्याचे जबाबदारीने मूल्यांकन करणे आवश्यक आहे.आपल्याला दोन्ही टोकांपासून सावध राहायला हवे. ना तर समस्या पूर्णपणे नाकारणे, ना कोणत्याही परिस्थितीला अतीभयावह समजणे.”

जयशंकर यांनी हेही स्पष्ट केले की, भारत हा समस्यांचे समाधान सकारात्मक राजनय आणि संवादाच्या माध्यमातून करू इच्छितो, आणि अशा प्रयत्नांमध्ये क्वाड सारखे मंच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि करारांची स्थिरता टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande