मुंबई, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
स्टेज सजला आहे, लाइट्स झगमगायला लागल्या आहेत आणि प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. कारण भारताचा सर्वात मोठा रिॲलिटी शो ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर प्रीमियर होत आहे.
या सीझनमध्ये टॅलेंटचा महास्फोट पाहायला मिळणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले कलाकार त्यांच्या भन्नाट कला, कल्पकतेने आणि आत्मविश्वासाने प्रेक्षकांचे मन जिंकणार आहेत.
या सीझनच्या जज पॅनेलमध्ये नवजोत सिंह सिद्धू, मलायका अरोरा आणि शान हे आहेत.
जो अजब आहे, वो गजब आहे, असे यावर्षीचे ब्रीदवाक्य आहे. याचाच प्रत्यय या सीझनमधील प्रत्येक परफॉर्मन्स देणार आहे. समाजातील अडथळ्यांना हरवून आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या प्रतिभावान स्पर्धकांच्या कहाण्या प्रेरणादायी ठरणार आहेत.
नवजोत सिंह सिद्धू म्हणाले,
“हे टॅलेंट्स देशाला केवळ आश्चर्यचकित करणार नाहीत, तर इतरांनाही त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रेरणा देतील.”
तर तयार व्हा — हास्य, भावना, संगीत आणि अजब-गजब परफॉर्मन्सच्या या शानदार प्रवासासाठी!
‘इंडियाज गॉट टॅलेंट’ रात्री ९:३० वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर