पुण्यातील सर्व उद्याने सोमवारी राहणार रात्री बारा वाजेपर्यंत सुरू
पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।कोजागिरी पौर्णिमेचा आनंद यंदाच्या वर्षी पुणेकरांना चांदण्यांच्या साक्षीने घेता येणार आहे. नागरिकांना खुल्या वातावरणात उत्सवाचा आनंद घेता यावा, यासाठी पुणे महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रमुख उद्याने व बागा या खा
पुण्यातील सर्व उद्याने सोमवारी राहणार रात्री बारा वाजेपर्यंत सुरू


पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।कोजागिरी पौर्णिमेचा आनंद यंदाच्या वर्षी पुणेकरांना चांदण्यांच्या साक्षीने घेता येणार आहे. नागरिकांना खुल्या वातावरणात उत्सवाचा आनंद घेता यावा, यासाठी पुणे महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रमुख उद्याने व बागा या खास दिवशी उशिरापर्यंत नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येणार आहेत.

कोजागरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी शहरातील महापालिकेची सर्व उद्याने सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुली ठेवली जाणार आहेत. उद्यान विभागाने हा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोजागिरी पौर्णिमेला नेहमीप्रमाणे हजारो नागरिक आपल्या कुटुंबियांसह रात्री उशिरापर्यंत फिरण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आणि पारंपरिक दूधपानाचा कार्यक्रम करण्यासाठी उद्यानात येतात. या पार्श्वभूमीवर सुरक्षाव्यवस्था, प्रकाशयोजना व स्वच्छतेची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande