- शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक
नाशिक, 5 ऑक्टोबर (हिं.स.) - लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या तक्रारीसाठी शिवसेनेने स्वतंत्र कक्षाची स्थापना केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न देखील गांभीर्याने घेताना सांगितले की संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात येणार आहे.
शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने रविवारी नाशिक मध्येबुथप्रमुख कार्यशाळा व प्रमुख पदाधिकारी बैठक घेण्यात आली . या बैठकीमध्ये बूथप्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आले विविध प्रकारच्या सूचना देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, उपनेते अजय बोरस्ते यांच्यासह विविध मान्यवरांनी केल्यत्याप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.व्यासपीठावर मंत्री दादा भुसे, ज्येष्ठ नेते अजय बोरस्ते व अन्य नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी जनतेने महायुतीला विधानसभेत निर्विवाद बहुमत दिले. नागरिकांचा आमच्यावर पूर्णपणे विश्वास असल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देखील महायुतीचा विजय निश्चित आहे. कार्यकर्त्यांनी देखील आता अधिक वेगाने तयारी सुरू केली आहे. राज्यात लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून , कोणत्याही भगिनींवर अन्याय होऊ नये यासाठी शिवसेनेने राज्यस्तरीय तक्रार निवारण मंच स्थापन केला आहे. राज्यातील नाशिक सह कोणत्याही अन्यायग्रस्त महिलेने तक्रार केल्यास न्याय देण्याचे काम शिवसेना करणार असल्याचा विश्वास देखील शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यात कोणत्याही परिस्थितीत नाशिकसह राज्यात महायुतीचा भगवा फडकणारअसा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्ह्यातील शिव सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
नाशिकच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये पडसाद दिसून आले यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की नाशिकच्या पालकमंत्री पदाचा विषय आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच न्यावा लागणार आहे तेच यातून मार्ग काढतील कारण राज्याचे चाणक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कुशल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सातत्याने प्रयत्न करत असूनही पालकमंत्री पदाचा प्रश्न हा सुटू शकला नाही त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यातून मार्ग काढतील असा विश्वास असल्याचे ते म्हणाल्यानंतर सभागृहात एकच हशा उपस्थितीमध्ये पिकला. पण या निमित्याने पुन्हा एकदा दादा भुसे यांची पालकमंत्री होण्याची मनीषा मात्र लपली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV