लातूरात लठ्ठपणा व आपले आरोग्य या विषयावर परिसंवाद व आरोग्य शिबिराचे आयोजन
लातूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था आणि शिवपुजे हार्ट केअर यांच्या संयुक्त विद्यमाने “लठ्ठपणा व आपले आरोग्य” या विषयावर परिसंवाद व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पक्षाच्या लातूर जिल्ह्याच्या नेत्या डॉक्टर अ
अ


लातूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था आणि शिवपुजे हार्ट केअर यांच्या संयुक्त विद्यमाने “लठ्ठपणा व आपले आरोग्य” या विषयावर परिसंवाद व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

भारतीय जनता पक्षाच्या लातूर जिल्ह्याच्या नेत्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यावेळी उपस्थित होत्या

या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, संतुलित आहार, व्यायाम व निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचविणे हा या शिबिरामागील उद्देश होता.

या प्रसंगी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था अध्यक्ष आदिनाथ सांगवे, सचिव माधवराव पाटील टाकळीकर, प्रख्यात लॅप्रोस्कोपिक आणि बॅरिएट्रिक सर्जन डॉ.जयश्री तोडकर, विजयकुमार रेवडकर, राजेश्वर बुके, सुनील मिटकरी, प्रदीप दिंडेगावे, अतुल देऊळगावकर, डॉ.स्नेहल शिवपुजे, डॉ.संजयकुमार शिवपुजे, प्राचार्य संजय गवई, डॉ.चंद्रशेखर अष्टेकर, अश्विनी रोडे, गुरुनाथजी बिराजदार तसेच विविध मान्यवर, वैद्यकीय तज्ज्ञ तसेच आरोग्यविषयक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande