लातूर : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट
लातूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या आठवड्यात पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान केले त्याची पाहणी करण्यासाठी उदगीर आणि जळकोट तालुक्याचा त्यांनी दौरा केला आहे.
अ


लातूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या आठवड्यात पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान केले त्याची पाहणी करण्यासाठी उदगीर आणि जळकोट तालुक्याचा त्यांनी दौरा केला आहे.

लातूर येथील जळकोट तालुक्यातील बेळसांगवी येथील शेतकरी मारुती संग्राम रायकवाडे यांनी आत्महत्या केली होती.आज त्यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री भोसले यांनी सांत्वनपर भेट घेवून कुटुंबीयांना धीर दिला. कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील असा शब्द दिला.

याप्रसंगी आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यावेळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande