छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.) साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य अजरामर आहे. त्यांच्या साहित्यातून महाराष्ट्राला आणि वाचकांना प्रचंड फायदे झाले. त्यांच्या साहित्याचे खंड मोफत वाटप करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी आज येथे सांगितले.
साहित्य, समाज आणि संस्कृती यांचा संगम घडवणारा हा उपक्रम लोकशाहीर यांचे विचार नव्या पिढीपर्यंत घेऊन जाणारा ठरणार असल्याचा उल्लेखही मंत्री सावे यांनी केला.
महाराष्ट्र शासन प्रकाशित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे खंड मोफत वाटप तसेच गुणवंत विद्यार्थी, साहित्यिक, अधिकारी, कर्मचारी आणि अण्णा भाऊ साठे चरित्रसाधने प्रकाशन समिती सदस्यांचा सत्कार सोहळा पार पडला..
फकिरा ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित हा प्रेरणादायी कार्यक्रम शिव छत्रपती महाविद्यालय, एन-३ सिडको येथे आयोजित करण्यात आला होता..
याप्रसंगी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री.किशोर शितोळे व मान्यवरांची उपस्थिती होती..
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis