लातूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापूर याच्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खते,बी बियाणे याचे वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.गेल्या आठवड्यात लातूर जिल्ह्यात पावसाने मोठे नुकसान केले शेती पिकाचे नुकसानही झाले. याची दखल घेऊन नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर हे लातूर येथे पोहोचले आणि त्यांनी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वाटप केली आहे यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे,प्रदेश सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण,प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे,लातूर जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिह भिकाणे,जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे,भागवत शिंदे,मनोज अभंगे,किरण चव्हाण,भागवत कांदे,पांडुरंग कदम,सचिन सिरसाठ,रवी सूर्यवंशी,संग्राम रोडगे,सचिन बिराजदार,सोमनाथ कलशेट्टी,बालाजी धोत्रे,अनिल पांढरे,योगेश सूर्यवंशी,बालाजी कांबळे इत्यादी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis