खा. बजरंग सोनवणे यांची ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण विषयक संसदीय समितीवर फेरनिवड
बीड, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। खासदार बजरंग सोनवणे यांची ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण विषयक संसदीय समितीवर फेरनिवड करण्यात आली आहे. सदरील समिती देशातील नागरिकांच्या अन्नसुरक्षा, अन्नधान्य वितरण, सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS), ग्राहकांचे हक्क, क
खासदार  बजरंग सोनवणे यांची ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण विषयक संसदीय समितीवर फेरनिवड


बीड, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

खासदार बजरंग सोनवणे यांची ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण विषयक संसदीय समितीवर फेरनिवड करण्यात आली आहे. सदरील समिती देशातील नागरिकांच्या अन्नसुरक्षा, अन्नधान्य वितरण, सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS), ग्राहकांचे हक्क, किंमत नियंत्रण व पोषण सुरक्षा यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर काम करते.

या समितीच्या माध्यमातून शेतकरी, अन्नधान्य उत्पादक, ग्राहक व सामान्य जनता यांच्याशी निगडित धोरणे ठरविण्यात येतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande