लातूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.) अपचुंदा, तालुका औसा येथील महावीर गोविंद बिराजदार यांची कन्या मृणाल महावीर बिराजदार हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून, सरकारच्या पाणी पुरवठा विभागातील भूजल सर्वेक्षण व विकास संस्था (GSDA) अंतर्गत राजपत्रित अधिकारी – कनिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ (Junior Geologist, Gazetted Officer) या प्रतिष्ठित पदावर महाराष्ट्रात नियुक्ती मिळवली आहे.
ही तिच्या अथक परिश्रमांची, चिकाटीची व ध्येयवेडाची यशस्वी परिणती असून, आमच्या गावासाठी व संपूर्ण बिराजदार कुटुंबासाठी अभिमानाचा व गौरवाचा क्षण आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis