बीड : महिलेला लेबर वार्डात प्रवेश न मिळाल्याने गेटसमोरच प्रसुती
बीड, 5 ऑक्टोबर (हिं.स.) : बीड जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. महिलेला लेबर वॉर्डमध्ये प्रवेश नाकारल्यामुळे ती बाहेर गेटसमोरच बेशुद्ध पडली आणि त्याच ठिकाणी तिची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही
जिल्हा रुग्णालयाची दुरावस्था


बीड, 5 ऑक्टोबर (हिं.स.) : बीड जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. महिलेला लेबर वॉर्डमध्ये प्रवेश नाकारल्यामुळे ती बाहेर गेटसमोरच बेशुद्ध पडली आणि त्याच ठिकाणी तिची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही महिला प्रसूतीवेदनांनी तडफडत असताना तिला लेबर वॉर्डात प्रवेश दिला गेला नाही. कोणत्याही स्टाफने तिची दखल घेतली नाही. परिणामी ती बेशुद्ध पडली आणि बाहेरच गेट समोर तिची डिलिव्हरी झाली. या घटनेने आरोग्य सेवकांच्या बेफिकीरीचा आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.रुग्णालयातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दररोज काही ना काही गैरप्रकार, निष्काळजीपणा, आणि रुग्णसेवेकडे दुर्लक्षाची उदाहरणे समोर येत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक यांचा वचक संपल्याने काही कर्मचारी मनमानी कारभार करत असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात सुरू आहे.

महत्त्वाचे म्हणजे, लेबर वॉर्डमध्ये बेशुद्ध अवस्थेत असलेल्या महिलेला पाहण्यासाठी कोणी स्टाफ उपस्थित नव्हता, आणि प्रसूती झाल्यानंतरही कोणतीही वैद्यकीय मदत तिला तत्काळ मिळाली नाही. या प्रकाराने आरोग्य व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.या घटनेनंतर नागरिक व सामाजिक संघटनांकडून मागणी होत आहे की, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर चौकशी करून कडक कारवाई करावी.“एखादी मोठी दुर्घटना घडली असती तर जबाबदार कोण?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता जिल्हा शल्यचिकित्सक आणि प्रशासन यावर कोणती भूमिका घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande