प्रा.डॉ. सखाराम कदम यांची स्व. मारोतराव कऱ्हाळे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड
परभणी, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। सोनपेठ येथील कै. रमेश वरपूडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत प्रा.डॉ. सखाराम कदम यांची हिंगोली येथील समृद्धी प्रकाशनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्व.मारोतराव कऱ्हाळे आदर्
प्रा.डॉ. सखाराम कदम यांची स्व. मारोतराव कऱ्हाळे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड


परभणी, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

सोनपेठ येथील कै. रमेश वरपूडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत प्रा.डॉ. सखाराम कदम यांची हिंगोली येथील समृद्धी प्रकाशनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्व.मारोतराव कऱ्हाळे आदर्श पुरस्कार 2025 साठी निवड झाली आहे.

याबाबतचे पत्र पुरस्काराचे संयोजक प्रा.डॉ. श्रीराम कऱ्हाळे (मराठी विभागप्रमुख, शिवाजी महाविद्यालय, हिंगोली) यांनी दिले आहे. पुरस्काराचे वितरण ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.

प्रा.डॉ. कदम हे प्रस्तुत महाविद्यालयात 2011 पासून मराठी विषयाचे अध्यापन करतात. त्यांनी त्यांचे पीएच.डी.चे संशोधन 'निवडक मराठी ग्रामीण कवितेतील स्त्री चित्रण' या विषयावर यापूर्वीच पूर्ण केले आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मधून प्रकाशित आहेत. त्यांना आतापर्यंत पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचा महात्मा जोतिराव फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, तसेच राजे संभाजी जयंती महोत्सव समिती जवळाबाजार कडून 'गुणवान युवक पुरस्कार' आदी पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेऊन राष्ट्रीय पातळीवरील या नामांकित पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री परमेश्वर कदम, कोषाध्यक्ष श्री रामेश्वर कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा चे समन्वयक डॉ. मुकुंदराज पाटील, मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.बालासाहेब काळे, प्रोफेसर डॉ.सा.द. सोनसळे व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी आदीनी त्यांचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande