छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। फुलंब्री च्या तहसील कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या सरपंच मंगेश साबळे यांच्या उपोषणाची मंत्र्यांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन तोडगा काढावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
आमदार रोहित पवार म्हणतात,
राज्यातील शेतकरी आज अतिवृष्टीने पुरता कोलमडला असून ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी फुलंब्री तहसील कार्यालयासमोर मागील सहा दिवसांपासून शेतकरी आमरण उपोषण करत आहेत.
उपोषणकर्ते सरपंच मंगेश साबळे यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असून सरकारने अजूनही दखल घेतलेली नाही.
त्यांची खालावत असलेली तब्येत बघता त्वरित त्या भागातील मंत्री किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ संवाद साधत तोडगा काढावा, ही विनंती!
त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी!
उद्या (सोमवार) त्यांची भेट घेणार आहे असेही पवार म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis