छ. संभाजीनगरात राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात
छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळेल अशा प्रकारचे उपक्रम आणि खेळ छत्रपती संभाजी नगरात नियमितपणे आयोजित करावेत असे आवाहन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय
अ


छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळेल अशा प्रकारचे उपक्रम आणि खेळ छत्रपती संभाजी नगरात नियमितपणे आयोजित करावेत असे आवाहन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि औरंगाबाद डिस्ट्रिक्ट पॅरालिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वी राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धा २०२५-२६ चे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला

या प्रसंगी उपस्थित राहून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले तसेच विविध जिल्ह्यांमधून आलेल्या स्पर्धकांना शुभेच्छा देण्यात आल्या,

या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विशेष खेळाडूंनी दाखवलेला आत्मविश्वास, जिद्द आणि संघर्षशीलता खरंच प्रेरणादायी आहे.

अशा प्रकारचे उपक्रम आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरात नियमितपणे आयोजित व्हावेत, जेणेकरून दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande