अल्पवयीन मुलीला एआयचा वापर करीत छायाचित्रे काढून ब्लॅकमेल व अत्याचार, तिघांना अटक
परभणी, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। सेलू शहरातील त्या अल्पवयीन मुलीचे एआय प्रणालीचा वापर करुन आरोपींनी अश्‍लिल छायाचित्रे काढून त्याद्वारे ब्लॅकमेल करीत तीच्यावर वारंवार अत्याचार केले असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत
अल्पवयीन मुलीला एआयचा वापर करीत छायाचित्रे काढून ब्लॅकमेल व अत्याचार, तिघांना अटक


परभणी, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

सेलू शहरातील त्या अल्पवयीन मुलीचे एआय प्रणालीचा वापर करुन आरोपींनी अश्‍लिल छायाचित्रे काढून त्याद्वारे ब्लॅकमेल करीत तीच्यावर वारंवार अत्याचार केले असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबद्दल एक विधी संघर्षग्रस्त बालक, नामांकित शाळेतील शिक्षक संतोष मलसटवाड, नितीन परदेशी यासह अन्य एका अनोळखी व्यक्ती विरोधात सेलू पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी तिघांना ताब्यातही घेतले आहे.

यातील प्रथम क्रमांकाचा आरोपी हा विधी संघर्षग्रस्त बालक असून सेलू शहरातील नामांकित नूतन विद्यालयातील शिक्षक संतोष मलसटवाड हा दुसरा आरोपी बाबासाहेब मंदिरापासून ते महाविद्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावरील एका फ्लॅटमध्ये एकटाच वास्तव्यास आहे. त्याच ठिकाणी त्याने अभ्यासिका थाटली आहे. तर नितीन परदेशी नामक तीसर्‍या क्रमांकाचा आरोपी हा एका कापड दुकानात नोकर आहे. त्याच्या वडिलाचा लॉन्ड्रीचा व्यवसाय असल्याने नमूद आरोपीचे त्या पिडीत अल्पवयीन मुलीच्या घरी जाणे-येणे आहे. आरोपी क्रमांक एक विधी संघर्षग्रस्त बालक, नितीन परदेशी व अनोळखी एक इसम हे तिघे मित्र आहेत.

या घटनेतील अल्पवयीन मुलगी ही शिकवणीस जात असतांना या तिघा मित्रांनी तीला बाजूला बोलावून अनोळखी व्यक्तीने तीचा चेहरा असलेले छायाचित्र एआय प्रणालीचा वापर करुन अश्‍लिल अवस्थेत असणारे दाखवून दिले व या अल्पवयीन मुलीस त्यांचा मित्र तथा आरोपी क्रमांक एक म्हणजे विधी संघर्षग्रस्त असणार्‍यास तू प्रपोज कर, स्विकारुन करुन त्याच्यासोबत लग्न कर अन्यथा तुझे हे छायाचित्र तुझ्या घरच्यांना दाखवून आम्ही तुझी बदनामी करु, अशी धमकी दिली. तसेच या आरोपींनी वेळोवेळी शिकवणीच्या ठिकाणी, शाळेमध्ये व घराकडेसुध्दा त्या अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग केला. तीला ब्लॅकमेलकरुन बोलण्यास भाग पाडले. तीला पाहिजे त्या ठिकाणी बोलावून घेतले. मोबाईल उचलला नाही तर छायाचित्र व्हायरल करु, असे धमकावले. शिक्षक असणार्‍या संतोष मलसटवाड हा सुट्टीच्या दिवशी संभाजीनगरला पत्नीच्या भेटीकरीता जात असत, त्याच्या गैरहजेरीत त्याच्या फ्लॅटची किल्ली ते या अल्पवयीन मुलीच्या कुटूंबियांकडे ठेवून जात, त्यांच्या गैरहजेरीत फ्लॅटची ती किल्ली घेऊन ती अल्पवयीन मुलगी त्या फ्लॅटवर जाऊन अभ्यास करत, त्यावेळी विधी संघर्षग्रस्त असणार्‍या बालकाने तीच्यावर जबरीने संभोग केला व त्यास नितीन परदेशी अन्य अनोळखी आरोपीने वेळोवेळी मदत केली. शिक्षक असणार्‍या मलसटवाड याने रायगड, महाबळेश्‍वर वगैरे ठिकाणी शाळेची सहल गेल्यानंतर या अल्पवयीन मुलीची कपडे बदलत असतांनाची व्हिडीओ क्लिप चोरुन काढली व वेळोवेळी तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन, तुझ्या घरच्यांना व्हिडीओ दाखवून तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली व या शिक्षकाने तो राहत असलेल्या फ्लॅटवर तीला वारंवार बोलावून बळजबरीने संभोग केला.

सेलू पोलिसांनी या प्रकरणात तीघांना तात्काळ ताब्यात घेऊन लगेचच जलदगतीने कसून तपास सुरु केला. तेव्हा गेल्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये तसेच 22 जूलै 2025 पासून 28 सप्टेंबर पर्यंत सेलू शहरात या घटना घडल्याचे चौकशीतून समोर आले. सेलू पोलिसांनी तात्काळ या आरोपींविरोधात कलम 64 (2) (आय) (एम) (एफ) 75,78,351 (2), (3) 3 (5), व्हीएनएस सह कलम 4,8,9 (एल) (एफ) 10,12 पोक्सो 2012 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, या प्रकरणात जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली सखोल चौकशी करीता समिती स्थापन केल्याची माहिती दिली. या प्रकरणात सर्वतोपरी पुरावे गोळा केले जातील व आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande