सोलापूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
पवित्र पोर्टलमधून शिक्षक भरती प्रक्रिया राबविताना भरती प्रक्रिया एक आणि दोन मधील अपात्र, गैरहजर, माजी सैनिक, समांतर आरक्षणाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्या जागा त्वरित रूपांतरित करून रिक्त जागांची यादी जाहीर करावे.जिल्हा किंवा विभागीय भरती प्रक्रिया न करता भरती प्रक्रिया ही पूर्वीप्रमाणे म्हणजेच केंद्रीय पद्धतीनेच राबवावे. संचमान्यता धोरण रद्द करावे. 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी किंवा सेवानिवृत्त शिक्षक ऐवजी पवित्र पोर्टलमधून डी.एड., बी.एड. पात्र उमेदवारांमधून कायम शिक्षक देण्यात यावे. अशा विविध मागण्यांचे निवेदन भावी शिक्षकांनी दिले आहे.यावेळी अजय पवार, राजकुमार तुपसौंदर, संदीप देशमुख, अली काझी, अमीर तांबोळी, दत्तात्रय कोकरे, ज्योती कवडे, नीलम डांगे, ज्योती नवले, पूजा चव्हाण, अश्विनी माने, प्रशांत शिरगुर आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड