चेकमेट स्पर्धेत अमेरिकेची भारतावर ५-० ने मात
वॉशिंग्टन, 5 ऑक्टोबर (हिं.स.)अमेरिकेतील अर्लिंग्टन येथे झालेल्या पहिल्याच चेकमेट स्पर्धेत यजमान अमेरिकेने भारतीय बुद्धीबळ संघावर ५-० असा विजय मिळवला. हिकारू नाकामुराने विश्वविजेत्या डी. गुकेशचा पराभव करण्याची किमया साधली. या सामन्यात अनेक तणावपूर्ण क
डी गुकेश


वॉशिंग्टन, 5 ऑक्टोबर (हिं.स.)अमेरिकेतील अर्लिंग्टन येथे झालेल्या पहिल्याच चेकमेट स्पर्धेत यजमान अमेरिकेने भारतीय बुद्धीबळ संघावर ५-० असा विजय मिळवला. हिकारू नाकामुराने विश्वविजेत्या डी. गुकेशचा पराभव करण्याची किमया साधली. या सामन्यात अनेक तणावपूर्ण क्षण पहायला मिळाले. दोन्ही संघांनी विजयी संधी निर्माण केल्या होत्या. पण अमेरिकेने संधींचा फायदा घेत महत्त्वपूर्ण विजय मिळवला.

ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी फॅबियानो कारुआनाकडून पराभूत झाला, तर ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला आंतरराष्ट्रीय मास्टर कॅरिसा यिपकडून पराभव सबन करावा लागला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मास्टर लेव्ही रोझमनने सागर शाहचा पराभव केला. तर इथन वाएझ आंतरराष्ट्रीय मास्टर टेनी अडेवुमीकडून पराभूत झाला. या स्पर्धेत भारताच्या एकाही बुद्धीबळपटूला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande