लातूरात संघ शताब्दी वर्षानिमित्त राजूर येथे विजयादशमीचे पथसंचलन संपन्न
लातूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।राजूर शहरातून विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतिशय शानदार असे पथसंचलन झाले. या पथसंचलनास राजुर शहरातील तसेच राजुर तालूक्यातील विविध गावांमधून स्वयंसेवक आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १९२५ स
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्षानिमित्त राजूर येथे विजयादशमीचे पथसंचलन संपन्न..


लातूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।राजूर शहरातून विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतिशय शानदार असे पथसंचलन झाले. या पथसंचलनास राजुर शहरातील तसेच राजुर तालूक्यातील विविध गावांमधून स्वयंसेवक आले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १९२५ साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी स्थापन केली असून आज २०२५ साली संघाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०० रुपयाचे नाणे व डाक तिकीट पण जारी केले आहे.

याच शतकपूर्ती निमित राजूर शहरातून क्षिप्र गणेश मंदिरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनास सुरवात झाली, व महात्मा बसवेश्वर चौक, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, मेन रोड, ग्रामदैवत हनुमान मंदिर, आंबेजोगाई रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर चौक, थोडगा रोड मार्गे शिव पार्वती मंगल कार्यालय, निजवंते नगर येथे शस्त्रपूजन करून या उत्सवाची सांगता झाली.

या विजयादशमी पथसंचलनास ५४० स्वयंसेवक गणवेशात तर २१६ नागरिक नागरी वेशात असे एकूण ७५६ स्वयंसेवक शस्त्रपूजन उत्सवात सहभागी झाले होते.

या उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून लातूर विभाग संपर्क प्रमुख मिलिंद बिलोलीकर हे उपस्थित होते. याप्रसंगी तालुका कार्यवाह विश्वरूप धाराशिवे, शहर कार्यवाह शिरीष हेंगणे यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील नागरीक, स्वयंसेवक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande