मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची आशा : गोपीचंद पडळकर
सोलापूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्याचे मुख्यमंत्री पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा खुप चांगला निर्णय मुख्यमंत्री येत्या काही दिवसांत घेतील असा आशावाद आमदार गोपीचंद पडळकर यांनी माढयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्
मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची आशा : गोपीचंद पडळकर


सोलापूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

राज्याचे मुख्यमंत्री पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा खुप चांगला निर्णय मुख्यमंत्री येत्या काही दिवसांत घेतील असा आशावाद आमदार गोपीचंद पडळकर यांनी माढयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत माढा तालुक्यातील पूरग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा घेऊन आले होते. त्यांनी उंदरगाव येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. नंतर केवड, खैराव,‌ कुंभेज या भागामधील जनावरांसाठी कार्यकर्त्यांनी चारा वाटप केले. यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले की राज्याला अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री लाभलेले आहेत.

आतापर्यंत महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा अशी संकट आली. तेव्हा अतिशय व्यवस्थितपणे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची भरीव मदत मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा खुप चांगला निर्णय मुख्यमंत्री येत्या काही दिवसांत घेतील. शेतकऱ्यांना भरीव मदत सरकारच्या माध्यमातून मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande