पुण्यात मलेरिया निदानासाठी आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण
पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।मलेरिया रुग्णांचे लवकर निदान झाल्यास, त्यावर तातडीने उपचार करता येतात, तसेच रोगाच्या प्रसाराचा धोका कमी होतो. याकरिता महापालिका प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सर्वेक्षण करते. प्रत्यक्ष सर्वेक्षणात वस्ती पातळीवर ताप आलेल्‍या रुग्णांचे
पुण्यात मलेरिया निदानासाठी आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण


पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।मलेरिया रुग्णांचे लवकर निदान झाल्यास, त्यावर तातडीने उपचार करता येतात, तसेच रोगाच्या प्रसाराचा धोका कमी होतो. याकरिता महापालिका प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सर्वेक्षण करते. प्रत्यक्ष सर्वेक्षणात वस्ती पातळीवर ताप आलेल्‍या रुग्णांचे रक्‍ताचे नमुने घेतले जातात, ते सकारात्‍मक आल्‍यास तत्काळ उपचार करण्यात येतात. मलेरिया विभागात पुरेशा मनुष्यबळाची नियुक्ती होईपर्यंत महापालिकेने २०० आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना मलेरिया तपासणी किटचे वाटप केले. त्‍यामुळे मलेरिया रुग्णांचे निदान जलद होण्यास मदत होत आहे.वाढणारी बांधकामे, वस्त्यामुळे पावसाचे पाणी साठून डासोत्पत्ती होते. मलेरियाच्या प्रसारासाठी हे अनुकूल वातावरण असते. परंतु, आरोग्‍य विभागाकडील अपुऱ्या मनुष्‍यबळामुळे तपासणी तातडीने होत नव्‍हती. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण देऊन सज्ज करणे आवश्यक असल्‍याने २०० आशांना आधी प्रशिक्षित केले.

त्‍यांनी इंडिया ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी महापालिकेच्या सामाजिक उत्तरदायित्‍व निधी विभागाकडे आरोग्यविषयक उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने आणखी ३०० आशांचे प्रशिक्षण घेण्यासाठी ३०० आशा तपासणी किटची आवश्यकता असल्याचे त्‍यांना सांगितले.

कंपनीच्‍या ‘सीएसआर’ व्‍यवस्‍थापक दीपाली काळे यांनी उपयुक्त विशेष कार्यालयाचे आशिष अग्रवाल व सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांच्‍या सहकार्याने किट दिल्‍या. आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण आरोग्य विभागाकडील संदेश देशपांडे, मिथिला रानडे, शोभा बनकर, विशाल रूपनर व नितीन विचारे यांनी घेतले, अशी माहिती आरोग्‍यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande