सौर ऊर्जेत पुणे, सोलापूर, सातार्‍याची आघाडी
सोलापूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। शेतकर्‍यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यात पुणे, सोलापूर, सातारा या तीन जिल्ह्यांतील तीन सौरप्रकल्पांमुळे 6 हजार 583 शेतकर्‍यांना सिंचनासाठी दिवसा वीजप
सौर ऊर्जेत पुणे, सोलापूर, सातार्‍याची आघाडी


सोलापूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

शेतकर्‍यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यात पुणे, सोलापूर, सातारा या तीन जिल्ह्यांतील तीन सौरप्रकल्पांमुळे 6 हजार 583 शेतकर्‍यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. ही जगातील सर्वात मोठी विकेंद्रित सौर प्रकल्प योजना आहे. या योजनेतून पूर्ण झालेल्या बारामती परिमंडळातील व्याहळी जि. पुणे (10 मेगावॅट), मरियाची वाडी जि.सातारा (13 मेगावॅट), सांगोला जि.सोलापूर (10 मेगावॅट) या तीन सौर प्रकल्पांचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.सांगोला, जि.सोलापूर येथे 32 एकर गायरान जमिनीवर 10 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. हा प्रकल्प 33/11 केव्ही यलमार मंगेवाडी या उपकेंद्राशी जोडण्यात आला आहे. या उपकेंद्रावरील कमलापूर, यलमार मंगेवाडी, अजनाळे, लिगाडेवाडी, वाटबरे, बलवडीया कृषीभारित 11 केव्ही वीज वाहिन्यांवरील (फिडर) 07 गावांतील 2 हजार 96 कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठ्याची सोय झाली आहे. यलमार मंगेवाडी, कमलापूर, अजनाळे, लिगाडेवाडी, वझरे, चिनके, सोनलवाडी या गावातील कृषी ग्राहक सांगोला सौर प्रकल्पामुळे लाभान्वित होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande