पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
सिंबायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट (SCMHRD)या संस्थेने व्यवस्थापन शिक्षणामध्ये आपले जागतिक स्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. व्यवसाय शिक्षणातील'गोल्ड स्टँडर्ड'मानले जाणारे प्रतिष्ठित'AACSB' (The Association to Advance Collegiate Schools of Business)पुनः प्रमाणपत्र संस्थेला प्रदान करण्यात आले आहे. या औपचारिक सन्मान सोहळ्यातAACSBचे साऊथ आशियाचे रिजनल हेड श्री. प्रताप दास यांच्या हस्ते हे प्रमाणपत्रSCMHRDला देण्यात करण्यात आले.
व्यवस्थापन शिक्षणामधील'गोल्ड स्टँडर्ड'मानले जाणारेAACSBप्रमाणपत्र,जगभरातील सहा टक्क्यांपेक्षा कमी बिझनेस शाळांना प्राप्त आहे. हे पुनःप्रमाणपत्रSCMHRDच्या शैक्षणिक उत्कृष्टता,प्रभावी संशोधन आणि भविष्यातील नेतृत्वासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. भारतातील अंदाजे ५००० हून अधिक बी-स्कूल्सपैकी,केवळ २४ संस्थांनाच हे प्रतिष्ठितAACSBप्रमाणपत्र मिळाले आहे.SCMHRDला २०२० मध्ये हे प्रमाणपत्र मिळाले होते आणि आता २०२५ मध्ये ते पुन्हा प्रमाणित करण्यात आले आहे.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र- कुलपती,डॉ. विद्या येरवडेकर यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, SCMHRDला २०२० मध्ये हा गौरव पहिल्यांदा मिळाला होता आणि आता हे पुनः प्रमाणपत्र मिळाल्यामुळे जागतिक दर्जाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाप्रती आमची निष्ठा अधिक दृढ झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु