सोलापूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
धाराशिव-परांडा बस शहरातील परांडा रस्त्यावरुन जात असताना महिला बस वाहकाने प्रवाशास अपंगत्वाचे कार्ड मागितले असता कार्ड नाही म्हणत महिलांनी शिवीगाळ करीत वाहक महिलेस मारहाण केली बससमोर झोपून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सहा महिलांविरोधात गुन्हा दाखल झाला असून सहाजणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.बेबी पठाण,शायदा पठाण,शकिला पठाण,रेश्मा पठाण, अफरिन पठाण,रमेजा पठाण(सर्व रा.समता नगर,न्यायालयाच्या पाठिमागे,परांडा,जि.धाराशिव)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत कविता मुंढे(बस वाहक रा,कळंबवाडी,ता.बार्शी)यांनी फिर्याद दाखल केली ही घटना शनिवार(ता.४)रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता बार्शी शहरातील परांडा रस्त्यावर भोसले रुग्णालयासमोर घडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड