माद्रिद, ६ ऑक्टोबर (हिं.स.)सेव्हिलाने गतविजेत्या बार्सिलोनाचा ४-१ ने पराभव केला. या विजयामुळे ला लीगामधील त्यांची विजयी मालिका संपुष्टात आली. २०१५ नंतर सेव्हिलाचा बार्सिलोनाविरुद्धचा हा पहिलाच लीग विजय ठरला आहे. त्यांना 8 सामन्यांत १३ गुणांसह तात्पुरते चौथे स्थान मिळवता आले आहे. बार्सिलोना १९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. बार्सिलोनाचा संघ अव्वल स्थानी विराजमान असलेल्या रिअल माद्रिदपेक्षा दोन गुणांनी पिछाडीवर आहे.
बार्सिलोनाने या सामन्यात संथ सुरुवात केली आणि पहिल्या अर्ध्या तासात त्यांना लक्ष्यावर एकही शॉट मारता आला नाही. तर सेव्हिलाने सुरुवातीच्या क्षणी लांब चेंडू वापरून ऍलेक्सिस सांचेझसाठी संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.१३ व्या मिनिटाला जेव्हा इसाक रोमेरो बार्सिलोनाच्या रोनाल्ड अरौजोशी टक्कर झाली.तेव्हा सेव्हिलाने आघाडी घेतली आणि VAR पुनरावलोकनानंतर पंचांनी पेनल्टी दिली. सांचेझने आपला माजी आर्सेनल संघातील सहकारी वोज्सिएच स्झ्झेस्नीला चुकीच्या मार्गाने पाठवून गोल केला.२७ व्या मिनिटाला रोमेरोचा शॉट रोखून सेव्हिलाला त्यांची आघाडी दुप्पट करण्यापासून रोखले. पण ३७ व्या मिनिटाला रोमेरोने रुबेन वर्गासच्या शानदार क्रॉसवर गोल करून संघाला २-० ने आघाडी मिळवून दिली.
हाफटाइमच्या अगदी आधी मार्कस रॅशफोर्डने डाव्या पायाने पेड्रीचा उंच पास नेटमध्ये हेड करून बार्सिलोनाकडून गोल केला. आणि संघ २-१ असा आघाडीवर आला. दुसऱ्या हाफमध्ये बार्सिलोनाने जोरदार दबाव आणला आणि ७६ व्या मिनिटाला अदनान जानुजाजने बॉक्समध्ये अलेजांद्रो बाल्डेला खाली पाडले तेव्हा त्यांना बरोबरी साधण्याची संधी मिळाली. पण रॉबर्ट लेवांडोव्स्कीचा पेनल्टी किक पोस्टच्या बाहेर गेला. ९० व्या मिनिटाला कार्मोनाने बचावपटूच्या पायांमध्ये गोळी मारून संघाला ३-१ असे केले तेव्हा बार्सिलोनाच्या आशा धुळीस मिळाल्या. इंज्युरी टाइममध्ये, पर्यायी
फुटबॉलपटू कोर ऍडम्सने चिदेरा एझुओकेच्या पासवर गोल करून संघाला ४-१ असे आघाडीवर नेले. सलग दुसरा सामना जिंकणारा सेव्हिलाचा पुढील सामना आंतरराष्ट्रीय विश्रांतीनंतर १८ ऑक्टोबर रोजी मॅलोर्काविरुद्ध खेळणार आहे. तर बार्सिलोनाचा सामना त्याच दिवशी गिरोनाविरुद्ध होईल.
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे