शांघाय मास्टर्स २०२५ : गतविजेता यानिक सिनर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
शांघाय, ६ ऑक्टोबर (हिं.स.) नेदरलँड्सच्या टॅलन ग्रिसपूर विरुद्धच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात पायाच्या दुखापतीमुळे गतविजेता यानिक सिनरला शांघाय मास्टर्स २०२५ मधून माघार घ्यावी लागली. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सिनरला तिसऱ्या सेटच्या चौथ्या गेममध्ये
यानिक सिनर दुखापतग्रस्त


शांघाय, ६ ऑक्टोबर (हिं.स.) नेदरलँड्सच्या टॅलन ग्रिसपूर विरुद्धच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात पायाच्या दुखापतीमुळे गतविजेता यानिक सिनरला शांघाय मास्टर्स २०२५ मधून माघार घ्यावी लागली.

जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सिनरला तिसऱ्या सेटच्या चौथ्या गेममध्ये पायाची दुखापत झाली. त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता. पण ६-७(३), ७-५, ३-२ असा गेम असाताना त्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या सेटमध्ये दोन्ही टेनिसपटूंमध्ये चुरशीची स्पर्धा होती. सिनरने टायब्रेकमध्ये उत्कृष्ट खेळ केला. दोन एस मारून सुरुवातीची आघाडी घेतली. दुसरा सेट आणखी रंगतदार झाला. डच टेनिसपटू ग्रिसपूरने दुसऱ्या गेममध्ये तीन ब्रेक पॉइंट वाचवले आणि अखेर ११ व्या गेममध्ये बॅकहँड शॉट मारून सेट जिंकला. आणि मध्यरात्रीनंतर सामना लांबला. तिसऱ्या सेटच्या चौथ्या गेममध्ये सिनरला दुखापत झाली. पुढच्या गेममध्ये त्याची प्रकृती आणखीनच बिकट झाली. कारण त्याने नेटमध्ये काही सोपे शॉट्स मारले ज्यामुळे ग्रीसला सहज ब्रेक मिळाला. अखेर त्याला दुखापतीमुळे टेनिस कोर्ट सोडावे लागले. आणि त्याने सामन्यातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. सिनरची दुखापत गंभीर असल्याची माहिती आहे आणि तो भविष्यातील स्पर्धांमध्ये किती लवकर परतू शकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande