जळगाव - विशेष अभियानात १० गावठी कट्टे हस्तगत तर १२ जणांवर आर्म ॲक्ट
जळगाव, 7 ऑक्टोबर (हिं.स.) स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाने विशेष अभियान राबवित ठिकठिकाणी दहा गावठी कट्टे २४ जिंवत काडतुस जप्त केले. या प्रकरणी बारा संशयितांवर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कायद
जळगाव - विशेष अभियानात १० गावठी कट्टे हस्तगत तर १२ जणांवर आर्म ॲक्ट


जळगाव, 7 ऑक्टोबर (हिं.स.) स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाने विशेष अभियान राबवित ठिकठिकाणी दहा गावठी कट्टे २४ जिंवत काडतुस जप्त केले. या प्रकरणी बारा संशयितांवर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस अलर्ट असुन अवैध कृत्य करणाऱ्यांची मुळीच गय करणार नाही. सावध राहावे, अशा शब्दात पोलीस अधीक्षक डॉ.म हेश्वर रेड्डी यांनी पोलिसिंगचा इरादा स्पष्ट केला.

पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले, १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान जळगाव जिल्हा पोलीस दलाने विशेष अभियान राबविले. जळगांव जिल्हा पोलीस आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात घटणारे गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीकोनातून १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान जळगाव जिल्हा पोलीस दलाने विशेष अभियान राबविले. या अभियानात अवैधरित्या अग्नीशस्त्र अनुषंगाने विशेष लक्ष देण्यात आले होते. एलसीबी शाखेसह त्या त्या पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तीकरित्या यामध्ये सहभाग घेतला होता. पाचोरा येथे समाधान बळीराम निकन तसेच अन्य एक यांच्याकडून दोन गावठी कट्टे, एक काडतुस हस्तगत केले. या संशयितांवर यापूर्वी आठ गुन्हे दाखल आहेत. अनिल मोहन चंडोले (अमळनेर) याच्याकडून दोन कट्टे तसेच चार काडतुस हस्तगत केले. युवराज उर्फ युवा राजु भास्कर (रा.यावल) तसेच त्याच साथीदार यांच्याकडुन एक देशी कट्टा तसेच व दोन काडतुस हस्तगत केले. अमर देवसिंग कसोटे (भुसावळ) याच्याकडुन एक गावठी कट्टा तसेच दोन काडतुस जप्त. काविन बाबु भोसले (रा. हलखेडा ता. वरणगाव) याच्याकडून एक देशी कट्टा एक काडतुस. विठ्ठल वामन भोळे (रा. जळगाव) एक देशी कट्टा. युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल याच्यासह तिघांकडून दोन कावठी कट्टा व दहा काडतुस असे एकुण ११ गावठी कट्टे व काडतुस जप्त केले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळचे अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी एलसीबी तसेच अधिकारी अंमलदार पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार यांनी हे अभियान राबविले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande