अमेरिकेत ट्रकच्या आयातीवर २५ टक्के कर होणार लागू
वॉशिंग्टन , 7 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (दि.६) घोषणा केली की 1 नोव्हेंबर 2025 पासून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व मध्यम आणि जड ट्रकांवर 25% आयात शुल्क (टॅरिफ) लावले जाईल. हा निर्णय अमेरिकन ट्रक उत्पादकांना परदेशी
१ नोव्हेंबर पासून अमेरिका आयात केलेल्या मध्यम आणि जड ट्रकवर २५% कर लादणार


वॉशिंग्टन , 7 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (दि.६) घोषणा केली की 1 नोव्हेंबर 2025 पासून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व मध्यम आणि जड ट्रकांवर 25% आयात शुल्क (टॅरिफ) लावले जाईल. हा निर्णय अमेरिकन ट्रक उत्पादकांना परदेशी स्पर्धेतून वाचवण्यासाठी घेण्यात आला आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “1 नोव्हेंबर 2025 पासून इतर देशांतून येणाऱ्या सर्व मिडियम आणि हेवी ड्युटी ट्रकांवर 25% टॅरिफ लावण्यात येईल.” ट्रम्प म्हणाले की, हा निर्णय परकीय स्पर्धेमुळे होणाऱ्या अन्यायकारक परिणामांपासून अमेरिकन कंपन्या आणि कामगारांचे संरक्षण करण्यासाठी घेतला आहे.त्यांनी पुढे सांगितले, “आम्ही आमच्या उद्योगांना परकीय डंपिंग आणि चुकीच्या व्यापार धोरणांमुळे नुकसान होऊ देणार नाही.”गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी सांगितले होते की हे टॅरिफ 1 ऑक्टोबरपासून लागू होईल, पण आता ही तारीख 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यांनी असा दावा केला की, हा निर्णय पीटरबिल्ट, केनवर्थ आणि फ्रेटलाइनर सारख्या अमेरिकन कंपन्यांना फायदा करून देईल.

या निर्णयाचा परिणाम अनेक देशांवर होणार आहे, जसे की, मेक्सिको, कॅनडा, जपान, जर्मनी आणि फिनलंड हे महत्त्वाचे देश आहेत. मेक्सिको हा अमेरिका ला सर्वाधिक मध्यम आणि जड ट्रक निर्यात करणारा देश आहे. 2019 पासून आतापर्यंत मेक्सिकोचा ट्रक निर्यात व्यवसाय तिपटीने वाढून सुमारे 3.4 लाख युनिट्स झाला आहे. युएसएमसीए (USA-Mexico-Canada Agreement) च्या अंतर्गत सध्या ट्रक कोणतेही शुल्क न भरता आयात करता येतात, जर त्यांची 64 टक्के किंमत नॉर्थ अमेरिकेमधून आली असेल. नवीन टॅरिफ या व्यवस्थेला प्रभावित करू शकतो.

स्टेलांटिस (जी ‘रॅम’ ब्रँडचे ट्रक आणि व्हॅन्स तयार करते) या कंपनीला आता मेक्सिकोमध्ये बनवलेल्या ट्रकांवर जास्त खर्च सहन करावा लागू शकतो. स्वीडनची व्होल्वो ग्रुप कंपनी —ही कंपनी मेक्सिकोच्या मॉन्टेरे शहरात 700 मिलियन डॉलर्स चा नवीन ट्रक प्लांट उभारत आहे, जो 2026 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. नवीन टॅरिफमुळे या गुंतवणुकीवरही परिणाम होऊ शकतो.सध्या अमेरिका, जपान आणि युरोपियन युनियन बरोबर झालेल्या व्यापार करारांनुसार हलक्या वाहनांवर 15 टक्के टॅरिफ लावतो, पण हे नवीन नियम जड वाहनांवर कसे लागू होतील, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande