बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसवर पुन्हा हल्ला; बलुच आर्मीने घेतली हल्ल्याची जबाबदारी
इस्लामाबाद, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।बलुचिस्तानमध्ये पुन्हा एकदा जाफर एक्सप्रेसवर हल्ला झाला आहे. ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटामुळे ट्रेनच्या अनेक बोग्या रुळावरून घसरल्या. हा हल्ला सिंध प्रांतातील सुलतानकोटजवळ करण्यात आला. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाल्याची
बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसवर पुन्हा हल्ला


इस्लामाबाद, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।बलुचिस्तानमध्ये पुन्हा एकदा जाफर एक्सप्रेसवर हल्ला झाला आहे. ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटामुळे ट्रेनच्या अनेक बोग्या रुळावरून घसरल्या. हा हल्ला सिंध प्रांतातील सुलतानकोटजवळ करण्यात आला. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानची जाफर एक्सप्रेस खैबर-पख्तूनख्वाच्या पेशावरहून बलुचिस्तानच्या क्वेटाकडे जात होती. या हल्ल्याची जबाबदारी बलुच बंडखोर गट ‘बलुच रिपब्लिकन गार्ड्स’ (बीआरजी) ने स्वीकारली आहे. बीआरजी या संघटनेच्या प्रवक्त्याने एका प्रेस नोटद्वारे म्हटले आहे, “शिकारपूर– बीआरजी क्षेत्रात जाफर एक्सप्रेसवर झालेल्या स्फोटाची जबाबदारी आम्ही घेतो. आज बलुच रिपब्लिकन गार्ड्सच्या स्वातंत्र्यसैनिकांनी शिकारपूर आणि जेकबाबाददरम्यान असलेल्या सुलतानकोट येथे रिमोट-कंट्रोल आयईडीचा स्फोट करून जाफर एक्सप्रेसला लक्ष्य केले.” ते पुढे म्हणाले, “हा स्फोट त्या वेळी करण्यात आला, जेव्हा पाकिस्तानी सैनिक या ट्रेनमध्ये प्रवास करत होते. या स्फोटात अनेक सैनिक ठार आणि जखमी झाले, तसेच ट्रेनच्या सहा बोग्या रुळावरून घसरल्या. बलुच रिपब्लिकन गार्ड्स (बीआरजी) या हल्ल्याची जबाबदारी घेतो आणि जाहीर करतो की बलुचिस्तान स्वतंत्र होईपर्यंत असे ऑपरेशन्स सुरूच राहतील.” या वर्षी मार्चपासून जाफर एक्सप्रेसला अनेक वेळा लक्ष्य करण्यात आले आहे. या आधीचा हल्ला २४ सप्टेंबर रोजी मस्तुंगच्या स्पिजेंड भागात झाला होता, ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांसह १० हून अधिक लोक जखमी झाले होते. या वर्षीच्या सुरुवातीस, बलुचिस्तानची राजधानी क्वेटाहून पेशावरला जाणारी जाफर एक्सप्रेस ही बलुच लिबरेशन आर्मी (बीलए) च्या मजीद ब्रिगेड ने अपहरण केली होती, आणि ४०० हून अधिक प्रवाशांना बंधक बनवले होते. ११ मार्च रोजी बलुचिस्तानच्या बोलन दरऱ्यातील ढाबर भागात रेल्वेची पटरी उडवण्यात आली, ज्यामुळे ट्रेनला थांबवावे लागले.सुरक्षा दल आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी नंतर पुष्टी केली की, बोलन दरऱ्यातील ‘सुरंग क्र. ८’ जवळ ट्रेनवर हल्ला झाला होता. या २४ तासांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षानंतर, बीएलए ने असा दावा केला की, त्यांनी अपहृत सुरक्षारक्षकांपैकी २० जणांना ओळख पटल्यानंतर ठार केले.ही मालिका केवळ बलुचिस्तानमधील अस्थिरता आणि पाकिस्तानच्या रेल्वे सुरक्षेवरील प्रश्नचिन्ह अधोरेखित करते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande