मुंबई, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। महिंद्रा अँड महिंद्राने भारतीय बाजारात लोकप्रिय एसयूव्ही बोलेरो आणि बोलेरो निओचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले आहे. दोन्ही गाड्यांमध्ये अलॉय व्हील्स, अपडेटेड ग्रिल डिझाइन आणि नवीन रंग पर्यायांसह काही किरकोळ बदल केले आहेत.
फेसलिफ्टेड महिंद्रा बोलेरो निओ आणि बोलेरो निओची किंमत मागील मॉडेलसारखीच आहे. बोलेरो निओची किंमत 8.49 लाख ते 9.99 लाख रुपये आहे. बोलेरोची किंमत 7.99 लाख ते 9.69 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. महिंद्राने दोन्ही एसयूव्हीच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र, सुधारित हँडलिंगसाठी सस्पेंशन कंपनीच्या नवीन ‘राइडफ्लो टेक’ नुसार ट्यून केले आहे.
महिंद्राने दोन्ही एसयूव्हीमध्ये नवीन टॉप-स्पेक व्हेरिएंट देखील जोडले आहेत. बोलेरो आता चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल: बी४, बी६, बी६ (ओ) आणि नवीन बी८ व्हेरिएंट. बोलेरो निओ पाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल: एन४, एन८, एन१०, एन१० (ओ) आणि नवीन एन११ व्हेरिएंट.
महिंद्रा बोलेरो निओ मध्ये नवीन काय?
नवीन महिंद्रा बोलेरो निओच्या फ्रंट डिझाइनमध्ये नवीन ग्रिल बसवून याला एक फ्रेश लुक देण्यात आला आहे. या ग्रिलमध्ये हॉरिझॉन्टल स्लॅट्स आणि क्रोम फिनिशिंग दिल्यामुळे कार अधिक प्रीमियम दिसते. यात दोन नवीन कलर ऑप्शन्स, जीन्स Blue आणि काँक्रीट ग्रे जोडले गेले आहेत, जे एसयूव्हीच्या नवीन एन११ व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असतील. हा नवीन टॉप-एंड एन ११ व्हेरिएंट ड्युअल-टोन पेंट आणि नवीन 16-इंच अलॉय व्हील्स सह येतो.
कारच्या इंटिरिअरमध्ये लूनर ग्रे रंगाची थीम दिली गेली आहे. हा रंग फक्त एन११ ट्रिम मध्ये उपलब्ध असेल, तर लोअर व्हेरिएंटमध्ये पूर्वीप्रमाणे मोचा ब्राउन शेड मिळत राहील. याशिवाय, सीट्समध्ये आता अधिक चांगली कुशनिंग देण्यात आली असून सोयीसाठी एक यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट सुद्धा जोडण्यात आला आहे.
बोलेरो निओच्या एन १0 आणि एन ११ व्हेरिएंट्स मध्ये आता 8.9-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम आणि रियर-व्यू कॅमेरा अशी नवी फीचर्स देण्यात आली आहेत.
महिंद्रा बोलेरोमध्ये नवीन काय?
नव्या महिंद्रा बोलेरो फेसलिफ्ट मध्ये कंपनीने स्टिल्थ ब्लॅक नावाचा नवीन पेंट शेड सादर केला आहे, जो सर्व व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असणार आहे. बोलेरोमध्ये आता नवीन डिझाइनची ग्रिल देण्यात आली असून त्यात आकर्षक क्रोम हायलाइट्स जोडले आहेत.
याशिवाय या एसयूव्हीत एक नवीन बी८ व्हेरिएंट सादर करण्यात आला आहे. या टॉप-स्पेक बी८ व्हेरिएंटमध्ये डायमंड-कट अलॉय व्हील्स, नवे फॉग लॅम्प्स, टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट, लेदर सीट कव्हर्स आणि अधिक आरामदायक सीट कुशनिंग सारखे फीचर्स दिली गेली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule