बहिणींच्या गूढ गोष्टीच्या उलगड्याने मालिकेच्या कथानकला नवा वळण येणार !
मुंबई, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। 'तुला जपणार आहे' मालिकेत प्रेक्षकांना एक नव, नाट्यमय वळण अनुभवायला मिळणार आहे. मंजिरीने अथर्व आणि मीराच्या नात्यात जवळीक यावी आणि ते अधिक खुलाव यासाठी देवीचा पारंपरिक गोंधळ आयोजित केला आहे. मात्र, या सगळ्यात तिच्या मनात काही वेगळाच डाव सुरू आहे. मीराला घराबाहेर जाऊ न देण्याचा तिचा कट आहे, ज्यामुळे तिला अंबिकाला कैदेत ठेवता येईल. गोंधळाच्या निमित्ताने मंजिरी तिच्या जवळ असलेल्या काळ्या जादूची क्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. यासाठी घरात एक लक्ष्मण रेषा आखली जाते जी मीरा ओलांडू शकणार नाही, असा नियम मंजिरी लादते. या कठीण प्रसंगात देवी आजी प्रकट होते आणि मीराला तिचं कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करते. देवी आजीच्या मार्गदर्शनानुसार मीरा भीतीवर मात करत घराबाहेर पडणार आहे. यासोबतच बहिणींच्या गूढ गोष्टीचा उलगडा मालिकेच्या कथानकला नवा वळण देणार आहे. मंजिरीचा डाव पुन्हा फसणार आहे. मीराच्या विश्वास आणि देवी आजीच्या आशीर्वादामुळे सत्याचा विजय होणार आहे.
आता मंजिरीचा पुढचा डाव काय असेल? आणि बहिणींच्या गूढ गोष्टीचा उलगडा मालिकेला कोणत्या वळणावर नेऊन ठेवणार ? यासाठी पाहायला विसरू नका ‘तुला जपणार आहे’ दररोज रात्री १०:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर !
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर