पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत विशेष मान्सून एडिशनचे आयोजन
पुणे, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत (पिफ) ११ -१२ ऑक्टोबर या दोन दिवशी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात विशेष मान्सून एडिशनचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. राज्य सरकार आणि पुणे फिल्म फाउंडेशनने
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत विशेष मान्सून एडिशनचे आयोजन


पुणे, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत (पिफ) ११ -१२ ऑक्टोबर या दोन दिवशी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात विशेष मान्सून एडिशनचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. राज्य सरकार आणि पुणे फिल्म फाउंडेशनने त्याचे आयोजन केले आहे. हा महोत्सव विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल अशी माहिती पिफच्या आंतरराष्ट्रीय सिनेमा निवड समिती उपसंचालिका आदिती अक्कलकोटकर यांनी दिली.

या महोत्सवात रसिकांना सहा जागतिक चित्रपट पाहता येतील. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता द टाइम इट टेकस् , दिग्दर्शक फ्रान्सिस्का कोमेन्सिनी (फ्रान्स, इटली), सायं. ६.१५ वाजता प्लॅस्टिक गन्स, दिग्दर्शक जीन-क्रिस्टोफ म्युराइज (फ्रान्स) आणि रात्री ८.१५ वाजता माय इव्हरीथींग, दिग्दर्शक ॲनी सोफी बेली (फ्रान्स) हे चित्रपट दाखविले जातील.

१२ ऑक्टोबर रोजी दु. चार वाजता डेलिरिओ, दिग्दर्शक ॲलेक्झांड्रा लॅटिशेव्ह सालाझार (कोस्टारिका, चिली), दुपारी ५.३० वाजता दि वायलिंग, दिग्दर्शक पेड्रो मार्टिन सॅलेरो (स्पेन, फ्रान्स, अर्जेंटिना) आणि रात्री ७.३० वाजता मॉंगरिल, दिग्दर्शक वि लियांग चियांग, यू कियाओ यिन (तैवान, सिंगापूर, फ्रान्स) हे चित्रपट दाखविले जातील.पिफ’ बरोबर मधल्या काळातही आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहता यावेत, या उद्देशाने या मान्सून एडिशनचे आयोजन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande