मुंबई, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। निसान मोटर इंडियाने आपल्या नवीन गाडीचे नाव जाहीर केले आणि जागतिक एसयूव्ही लाइनअपमधील आवृत्तीच्या डिझाइनची आकर्षक झलक सादर केली: ती म्हणजे ऑल-न्यू निसान टेक्टॉन.निसानच्या महत्वाकांक्षेची ओळख पटवणारे नाव टेक्टॉन हे नाव ग्रीक असून त्याचा अर्थ कारागीर किंवा आर्किटेक्ट आहे. हे निसानच्या अचूक अभियांत्रिकी आणि जीवन समृद्ध करणाऱ्या नावीन्यपूर्णतेच्या नीतिमत्तेशी सुसंगत आहे. हे नाव एक शक्तिशाली, प्रीमियम सी-एसयूव्ही दर्शवते जे अभियांत्रिकी उत्कृष्टता, कामगिरी आणि एक विशिष्ट डिझाइन ओळख आहे. टेक्टॉन हे त्यांच्यासाठी एक पर्याय असेल जे त्यांच्या करिअर, आवडी किंवा जीवनशैलीद्वारे आपल्या जगाला आकार देत आहेत.
२०२६ मध्ये पूर्ण अनावरण आणि विक्री सुरू होण्यापूर्वी टेक्टॉनची रचना आणि इंजिनिअरिंग सी-एसयूव्ही सेगमेंटमध्ये बदल घडवून आणण्यासाठी करण्यात आली आहे. हे निसानच्या 'वन कार, वन वर्ल्ड' धोरणांतर्गत दुसरे उत्पादन असेल, जे चेन्नई प्लांटमध्ये रेनॉल्ट या अलायन्स पार्टनरसोबत भागीदारीत उत्पादित केले जाईल आणि भविष्यात निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये निर्यात केले जाईल.
डिझाइन आणि प्रेरणा
निसानच्या नवीन एसयूव्ही, टेक्टॉनला कंपनीच्या सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या आणि सर्वात प्रतिष्ठित एसयूव्ही असलेल्या पेट्रोलपासून डिझाइन प्रेरणा मिळाली आहे. पुढच्या वर्षी ती येईल तेव्हा ती धाडसी सौंदर्यशास्त्र, मजबूत विश्वासार्हता, प्रीमियम कारागिरी आणि प्रगत तंत्रज्ञान वैशिष्ट्यांचा संच एकत्र करेल.
समोर एक शक्तिशाली शिल्पित बॉनेट आणि विशिष्ट सी-आकाराचे हेड लॅम्प सिग्नेचर - पेट्रोलची आठवण करून देणारे असून ते मजबूत खालच्या बंपरसह जोडलेले आहे. त्यातून वाहनाचा आकार मोठा असला तरी ती नियंत्रणात राहते.बाजूच्या प्रोफाइलमध्ये एक आकर्षक, मस्क्युलर रचना आहे आणि त्यातून रस्त्यावर गाडी ठळकपणे दिसते. टेक्टॉनच्या पुढील दरवाज्यांवर 'डबल-सी' आकार आहे. त्यात हिमालयाने प्रेरित सूक्ष्म पर्वतरांगांचा आकृतिबंध समाविष्ट आहे.मागील बाजूला गाडीच्या रुंदीपर्यंत लाल रंगाचा प्रकाश असलेला लाईटबार पसरलेला आहे. तो गाडी मजबूत असल्याची जाणीव देतो आणि 'सी-आकाराच्या' डायनॅमिक टेल-लॅम्पला जोडतो. टेक्टॉन नेमप्लेट खाली टेलगेटवर ठळकपणे प्रदर्शित केलेली आहे.
निसान मोटर कंपनी लिमिटेडचे कॉर्पोरेट कार्यकारी अल्फोन्सो अल्बाइस म्हणतात, ऑल-न्यू निसान टेक्टॉनची डिझाईन आजच्या आधुनिक भारतीय ग्राहकांच्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी, वर्चस्व गाजवण्यासाठी आणि सौंदर्यासाठी डिझाइन केलेली आहे. आकर्षक, स्टायलिश आणि भारत आणि त्यापलीकडे एक नवीन बेंचमार्क स्थापित करण्यासाठी बनवलेली, डिझाइन आणि बिल्डची गुणवत्ता स्पष्टपणे निसान आहे आणि ती निसानच्या एसयूव्ही डीएनएचे सर्वोत्तम प्रतीक आहे.
निसान मोटरचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले, नवीन निसान टेक्टॉन ही निसानच्या विकासाच्या कथेच्या केंद्रस्थानी असणार आहे आणि देशातील आमच्या उत्पादन पोर्टफोलिओच्या भविष्याची झलक दाखवते. तिचे प्रभावी अस्तित्व, बोल्ड लूकमुळे आणि प्रीमियम इंटीरियरमुळे आम्हाला विश्वास आहे की ती सेगमेंटमध्ये एक उत्साह निर्माण करणारी ठरेल, जी मजबूत पण आगळ्यावेगळ्या सी-एसयूव्ही शोधणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करेल. हे मॉडेल भारतातील निसानच्या विकासाच्या कथेचे नेतृत्व करेल.
निसान मोटर इंडियाच्या देशात आपली उपस्थिती मजबूत करण्याच्या आणि उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या योजनांमध्ये टेक्टॉन महत्त्वाची भूमिका बजावेल. या वाढीचा एक भाग म्हणून, निसान मोटर इंडिया आपल्या डीलरशिप नेटवर्कचा वेगाने विस्तार करत आहे. विशिष्ट निर्यात बाजारपेठा वाढविण्यासह अधिक तपशील भविष्यातील घोषणेत जाहीर केले जातील. अधिक माहितीसाठी
www.nissan.in ला भेट द्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule