अपघातानंतर विजय देवरकोंडाने चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
हैदराबाद, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।लोकप्रिय दक्षिण भारतीय अभिनेता विजय देवरकोंडा यांचा सोमवारी(दि.६) संध्याकाळी हैदराबाद-बंगळुरू महामार्गावर अपघात झाला.या अपघातात विजयच्या डोक्याला दुखापत झाली. यानंतर आता विजय यांनी स्वतः माहिती दिली आहे की ते बरे आहेत आ
विजय देवराकोंडा


हैदराबाद, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।लोकप्रिय दक्षिण भारतीय अभिनेता विजय देवरकोंडा यांचा सोमवारी(दि.६) संध्याकाळी हैदराबाद-बंगळुरू महामार्गावर अपघात झाला.या अपघातात विजयच्या डोक्याला दुखापत झाली. यानंतर आता विजय यांनी स्वतः माहिती दिली आहे की ते बरे आहेत आणि रुग्णालयातून परतले आहेत.

अपघातानंतर विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून लिहिले आहे, सर्व काही ठीक आहे. गाडीला धडक बसली, पण आम्ही सर्व ठीक आहोत. मी जाऊन स्ट्रेंथ वर्कआउट केला आणि आता मी घरी आहे. माझे डोके दुखत आहे, पण बिर्याणी आणि झोप बरं करू शकणार नाही, असं काहीच नाही. तुम्हा सर्वांना खूप प्रेम. कोणत्याही बातम्यांमुळे तुम्ही ताण घेऊ नका,”

माहितीनुसार, विजय देवरकोंडा आणि त्यांचे कुटुंब रविवार, ५ ऑक्टोबर रोजी पुट्टपार्थी येथे भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या महासमाधीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. ते सोमवारी हैदराबादला रवाना झाले, परंतु अभिनेत्याच्या गाडीला जोगुलंबा गडवाल जिल्ह्यातील उंडावल्ली परिसरात (एनएच-४४) अपघात झाला. विजयची गाडी पुढे जात असताना एका भरधाव वेगाच्या बोलेरो कारने त्याच्या गाडीला मागून धडक दिली.थांबण्याऐवजी बोलेरो चालक घटनास्थळावरून पळून गेला. विजयच्या चालकाने अपघाताची तक्रार स्थानिक पोलिसांना दिली. सध्या बोलेरो चालकाचा शोध सुरू आहे.

या वर्षी जुलैमध्ये प्रदर्शित झालेल्या 'किंग्डम' चित्रपटात विजय देवरकोंडा यांनी भूमिका केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त, विजय देवरकोंडा सध्या त्याची कथित प्रेयसी रश्मिका मंदानासोबतच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande