नवी दिल्ली , 8 ऑक्टोबर (हिं.स.)। वायुदल आज आपला ९३ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी बुधवारी सकाळीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत वायुदलाला शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) सह तिन्ही सैन्यांच्या प्रमुखांनी युद्ध स्मारकावर एकत्र येऊन वीरांना श्रद्धांजली वाहिली.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, “वायुसेना दिनानिमित्त सर्व वायुयोध्दा, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!” त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हणाले, “भारतीय वायुदल हे शौर्य, शिस्त आणि अचूकतेचे प्रतीक आहे. आकाशाचे रक्षण करताना त्यांनी अतिशय कठीण परिस्थितींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नैसर्गिक आपत्तींच्या काळातही त्यांचे योगदान अतिशय उल्लेखनीय राहिले आहे. त्यांच्या समर्पणावर, व्यावसायिकतेवर आणि अदम्य साहसावर प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.” आज चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान, वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी राष्ट्रीय युद्धस्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून वीरांना श्रद्धांजली वाहिली.यानंतर सर्वजण गाझियाबादमधील हिंडन एअरबेस येथे दाखल झाले, जिथे वायुसैनिकांची भव्य परेड आयोजित करण्यात आली होती. वायुदलप्रमुखांनी परेडचे निरीक्षण केले आणि वायुसैनिकांकडून मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी परेडमध्ये उपस्थितांना संबोधित केलं. हे पहिलं वर्ष आहे की वायुदल आपला स्थापना दिवस दोन टप्प्यांमध्ये साजरा करत आहे.पहिला टप्पा : हिंडन एअरबेसवर परेड आणि वायुदलप्रमुखांचे भाषण. दुसरा टप्पा : लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टरांच्या हवामानवीर प्रदर्शनाचा कार्यक्रम ९ नोव्हेंबरला गुवाहाटीमध्ये होणार आहे. हिंडनमध्ये यावेळी मिग-२१ विमान देखील ठेवण्यात आले होते. तब्बल सहा दशकं सेवा दिल्यानंतर हे विमान नुकतेच सेवेतून निवृत्त झाले आहे. याशिवाय, राफेल आणि सुखोई-३० सारखी मारक विमानेही नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. या विमानांनी पाकिस्तानविरुद्ध कारवायांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. यंदा हिंडन एअरबेसवर फ्लायपास्ट (हवाई प्रदर्शन) आयोजित करण्यात आलेलं नाही. कारणं राजधानी भागातील वाढलेलं हवाई वाहतूक दडपण (एअर ट्रॅफिक) फ्लायपास्टसाठी सराव आवश्यक असतो, ज्यासाठी काही दिवस हवाई वाहतूक थांबवावी लागते. परिसरात घनदाट लोकवस्ती आणि बर्ड हिट होण्याचा धोका कायम असतो. म्हणूनच यंदाचा फ्लायपास्ट गुवाहाटीला हलवण्यात आला आहे. सध्या गुवाहाटीमध्ये हवामान अनुकूल नसल्यामुळे ९ नोव्हेंबर ही तारीख त्यासाठी निवडण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode