सरकारी रुग्णवाहिका नावालाच; महिलेची भर रस्त्यात प्रसूती
त्रंबकेश्वर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। दोन तासापासून कॉल करून ॲम्बुलन्स न आल्याने गरोदर मातेची रस्त्यातच डिलिव्हरी झाल्याची घटना त्रंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्ष येथे घडली, कॉल करूनही वाहन उपलब्ध करून न देणाऱ्या यंत्रणेचा जाहीर निषेध केला जात असून आदि
सरकारी रुग्णवाहिका नावालाच; महिलेची भर रस्त्यात प्रसूती


त्रंबकेश्वर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। दोन तासापासून कॉल करून ॲम्बुलन्स न आल्याने गरोदर मातेची रस्त्यातच डिलिव्हरी झाल्याची घटना त्रंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्ष येथे घडली, कॉल करूनही वाहन उपलब्ध करून न देणाऱ्या यंत्रणेचा जाहीर निषेध केला जात असून आदिवासींच्या नशिबी नेहमीच वनवास असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मातेला आणि बाळाला शासनाने मोफत ॲम्बुलन्स सुविधा उपलब्ध करून दिली मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होतच नसल्याने भर रस्त्यात डिलिव्हरी ची वेळ आली होती. सुदैवाने खाजगी वाहनाने महिलेला रुग्णालयात नेले जात असतानाच वाहनातच तिची डिलिव्हरी सुखरुप झाली. या प्रकाराने सरकारी रुग्णवाहिका चा प्रश्न आणि कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्षेतील एका महिलेला आज सकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्याने सकाळी सहा वाजेपासून सदर महिला 102, 108 वर कॉल करून ॲम्बुलन्स ची मागणी करत होती मात्र त्यांना अनेक कारणे सांगून ॲम्बुलन्स देण्यास नकार दिला. शेवटी त्या मातेला खाजगी वाहनातून त्र्यंबकेश्वर येथे डिलिव्हर साठी देत असताना पहिणे गावा जवळ खाजगी वाहना मध्ये डिलिव्हरी झाली सुदैवाने तिची डिलिव्हरी सुखरूप झाली

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande